फोटो सौजन्य - Social Media
द इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (IICT)ने भरतीचे आयोजन केले आहे.मुळात, या भरतीच्या माध्यमातून रोजगाराच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना फार फायदा होणार आहे. एकूण १५ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. ज्युनिअर सेक्रेटरीएट पदाच्या रिक्त जगन्ना भरण्यासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये आहात तर तुम्ही नक्कीच या भरतीचा लाभ घेऊ शकता. परंतु, या भरतीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. पात्रता निकषांना पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.चला तर मग जाणून घेऊयात या भरतीप्रक्रियेविषयी:
३१ जानेवारी २०२५ रोजी या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार ३ मार्च २०२५ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना या भरतीमध्ये नियुक्त होण्यासाठी काही नियुक्तीच्या टप्प्यांना पात्र करावे लागणार आहे. या संदर्भात परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परंतु, याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपये रक्कम भरावी लागणार आहे. तसेच OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना या भरतीसाठी सारखीच रक्कम भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे काही आरक्षित गटांना ही भरती पूर्णपणे निशुल्क आहे.त्यांच्याकडून एकही रुपये आकारण्यात येणार नाही आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती यांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. तसेच PWD आणि महिला उमेदवारांनादेखील निशुल्क अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे.
पात्रता निकषांमध्ये काही शैक्षणिक अटी शर्ती तसेच वयोमर्यादे संदर्भात असणाऱ्या शैक्षणिक अटी शर्तींचा समावेश आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान १८ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.एकूण १५ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली असून, अर्ज करता उमेदवार १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने टाइपिंग संबंधित कोर्स पूर्ण केले असावे.
नियुक्तीच्या प्रक्रियेत पुढील चार टप्प्यांचा समावेश आहे: