फोटो सौजन्य - Social Media
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत इंटेलिजन्स ब्युरो (IB) कडून असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) ग्रेड-II टेक्निकल पदांसाठी नवीन भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 258 रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीची अधिसूचना 23 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 25 ऑक्टोबर 2025 ते 16 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सुरू राहील. कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागात ही भरती आयोजित करण्यात आली आहे. कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात एकूण ९० जागा रिक्त आहेत. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागात १६८ जागा रिक्त आहेत.
एक ठराविक शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागासाठी अर्ज करण्यास संबंधित शाखेतील पदवी/डिप्लोमा आणि वैध GATE स्कोअर असणे गरजेचे आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागात संबंधित शाखेतील पदवी/डिप्लोमा आणि वैध GATE स्कोअर असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. वयाची गणना 16 नोव्हेंबर 2025 या तारखेपर्यंत केली जाईल. शासकीय नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सवलत लागू राहील.
नियुक्तीच्या प्रक्रियेत एकूण पाच टप्पे आहेत. यामध्ये लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, मुलाखत, कागदपत्रांची पडताळणी तसेच वैद्यकीय तपासणीचा समावेश आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. General / OBC / EWS उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २०० रुपये भरावे लागणार आहेत. तर SC / ST / PWD उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. पेमेंट ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहे. इंटेलिजन्स ब्युरो ACIO II/Tech भरती 2025 ही देशातील प्रतिष्ठित नोकरींपैकी एक मानली जाते. तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या आणि देशसेवेची भावना जपणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.