खुशखबर! 'या' पोलिस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख वाढली (Photo Credit - X)
SSC Delhi Police Constable Bharti 2025: दिल्ली पोलिस (Delhi Police) मध्ये कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष आणि महिला परीक्षा २०२५ साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) हा निर्णय घेतला असून, ऑनलाइन अर्ज करण्याची नवीन अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ (रात्री ११ वाजेपर्यंत) असेल. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ ऑक्टोबर २०२५ होती. या भरतीअंतर्गत कॉन्स्टेबल पुरुष व महिला तसेच माजी सैनिक श्रेणींमध्ये एकूण ७,५६५ पदांवर भरती केली जाणार आहे.
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेकडून १०+२ (इंटरमीडिएट) पास असणे अनिवार्य. (विशेष पदांसाठी/दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ११वी पास देखील मान्य.)
किमान १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २५ वर्षे. (जन्म २ जुलै २००० पूर्वी आणि १ जुलै २००७ नंतर नसावा). आरक्षित वर्गांना नियमांनुसार वयात सवलत.
सरकारी नोकरीची संधी! ‘या’ ७ प्रमुख भरतींसाठी अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा , झटपट भरा करा अर्ज
पीई आणि एमटी (Physical Efficiency & Measurement Test) च्या वेळी कार किंवा मोटरसायकल चालवण्याचा वैध परवाना असणे आवश्यक.
दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल (एग्जीक्यूटिव) भरती २०२५ साठी अर्ज शुल्क १०० रुपये ठेवले आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), महिला आणि PwD उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची गरज नाही. निवड झालेल्या उमेदवारांना पे-लेवल-३ नुसार २१,७०० रुपये ते ६९,१०० रुपये इतके वेतन मिळेल. यासोबतच महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर सुविधा देखील मिळणार आहेत.