Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीतील प्रदूषणाचा परिणाम! पाचवीपर्यंतचे वर्ग हायब्रिड पद्धतीने सुरू, बोर्डाची परिक्षा ऑनलाईन?

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे GRAP चा तिसरा टप्पा लागू, पाचवीपर्यंतच्या शाळा हायब्रिड पद्धतीने सुरू. पालक संघटनेकडून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही हायब्रिड मोड सुरू करण्याची मागणी.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 13, 2025 | 03:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) चा तिसरा टप्पा लागू
  • इयत्ता पाचवीपर्यंतच्या सर्व सरकारी आणि खासगी शाळांना हायब्रिड पद्धतीने वर्ग
  • दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही हायब्रिड मोड सुरू करावा- मागणी

दिल्ली आणि एनसीआरमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्रदूषणामुळे स्थानिक लोकांना (Pollution in Delhi) आरोग्याच्या संबंधित प्रश्न उद्भवत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे अर्थात रुग्णांची संख्याही वाढत आहे. यामुळे सरकारने ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) चा तिसरा टप्पा लागू केला आहे. या निर्णयानुसार, इयत्ता पाचवीपर्यंतच्या सर्व सरकारी आणि खासगी शाळांना हायब्रिड पद्धतीने वर्ग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हणजेच, विद्यार्थी आणि पालक आपल्या सोयीप्रमाणे ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिक्षणाचा पर्याय निवडू शकतात.

MJEP मध्ये २९० विविध पदांसाठी भरती! कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी एकूण १४४ जागा

शुक्रवारी दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ३६२ होता, जो सोमवारी वाढून ४२५ वर पोहोचला. या भीषण हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा आणि शक्य असल्यास घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची दमछाक उडत आहे. बाहेर जावे की नाही जावे? असा प्रश्न लोकांच्या मनात तयार होत आहे.

युनिसेफच्या २०२१ च्या अहवालानुसार, भारतातील केवळ २४% कुटुंबांकडेच ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक इंटरनेट सुविधा आहे. त्यामुळे विशेषतः सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना याचा मोठा तोटा होऊ शकतो. जागतिक बँकेच्या अहवालात नमूद केलं आहे की, ऑनलाइन शिक्षणामुळे सरकारी आणि खासगी शाळांमधील शिक्षणातील तफावत वाढली आहे. प्रदूषणामुळे दरवर्षी शाळा बंद राहिल्याने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सरकारी नोकरीची संधी! २७०० पदांसाठी निघाली भरती, BOB मध्ये करा आजच अर्ज

पालक संघटनेच्या अध्यक्षा अपराजिता गौतम यांनी मागणी केली आहे की, फक्त पाचवीपर्यंतच नव्हे, तर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही हायब्रिड मोड सुरू करावा आणि बोर्ड परीक्षांसाठी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय द्यावा. दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणाचा जोर लक्षात घेता काही गोष्टींवर बंदी करण्यात आली आहे. यामध्ये तोडकाम, अनावश्यक बांधकाम आणि स्टोन क्रशर कामांचा समावेश आहे. तसेच सिमेंट व वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रकची परवानगी या काळात रद्द करण्यात आली आहे. जुनी डिझेल वाहने व दिल्लीबाहेरील डिझेल बसवर निर्बंध बसवण्यात आले आहेत. इर्मजन्सी सेवांव्यतिरिक्त डिझेल जनरेटरचा वापर बंद करण्यात आला आहे. तसेच कंपन्यांना वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रिड मोडवर काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: Impact of pollution in delhi classes up to 5th started in hybrid mode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • Career
  • delhi
  • Delhi Air Pollution

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast: दिल्लीतील स्फोटानंतर ‘दहशतवाद्यांचा’ जल्लोष; फुलांनी केले स्वागत; Video पहिला तर तुमचेही रक्त खवळेल!
1

Delhi Bomb Blast: दिल्लीतील स्फोटानंतर ‘दहशतवाद्यांचा’ जल्लोष; फुलांनी केले स्वागत; Video पहिला तर तुमचेही रक्त खवळेल!

Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
2

Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Delhi Blast : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट, उमरची दुसरी कार Eco Sport जप्त; संशयास्पद लाल कारबद्दल तपासात मोठे खुलासे
3

Delhi Blast : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट, उमरची दुसरी कार Eco Sport जप्त; संशयास्पद लाल कारबद्दल तपासात मोठे खुलासे

Delhi Blast: भयानक! 6 जिल्ह्यातील 12 ठिकाणी फिरला होता दिल्ली ब्लास्ट कारमधील डॉ. उमर, एजन्सीला बसला धक्का
4

Delhi Blast: भयानक! 6 जिल्ह्यातील 12 ठिकाणी फिरला होता दिल्ली ब्लास्ट कारमधील डॉ. उमर, एजन्सीला बसला धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.