फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र जीवन विमा प्राधिकरण (MJEP) मार्फत राज्यभरातील पात्र उमेदवारांसाठी मोठी रोजगारसंधी उपलब्ध झाली आहे. (Job in MJEP) संस्थेने एकूण २९० विविध पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली असून इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट [mjp.maharashtra.gov.in](https://mjp.maharashtra.gov.in) वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. या भरतीअंतर्गत अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक लेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व मेकॅनिकल), उच्च आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक, सहाय्यक स्टोअरकीपर आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांसाठी भरती होणार आहे. या सर्व पदांसाठी एकूण २९० जागा असून त्यापैकी सर्वाधिक १४४ जागा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी राखीव आहेत.
पात्रतेसाठी उमेदवारांनी पदानुसार B.Com, B.Tech, B.E, डिप्लोमा, पदव्युत्तर पदवी किंवा १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडेल. प्रथम ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा ₹१९,९०० ते ₹१,७७,५०० इतके वेतन मिळणार आहे. खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹१,००० असून बीसी, एससी, अनाथ आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी ₹९०० रुपये आहे, तर माजी सैनिकांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः मोफत ठेवण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी mjp.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन “Recruitment” किंवा “Career” विभागातील नवीन भरती लिंक निवडावी. त्यानंतर आपले नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरावी. मागवलेली कागदपत्रे अपलोड करून शुल्क भरावे आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंटआउट घेऊन ठेवावा. ही भरती महाराष्ट्रातील तरुण पदवीधर आणि तांत्रिक पात्रता असणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी ठरू शकते. तसेच, राज्यातच नव्हे तर केंद्र पातळीवरही विविध भरत्या सुरू आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्रात १९७४ पदांसाठी तर सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (CCRH) मध्ये ८९ पदांसाठी भरती सुरू असून महिलांसाठी अर्ज शुल्क मोफत ठेवले आहे. त्यामुळे सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांनी वेळ न घालवता त्वरित अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आपल्या करिअरची दिशा निश्चित करावी.






