फोटो सौजन्य - Social Media
भारतीय नौदलाने भरतीच्या प्रक्रियेचे आयोजन केले आहे. या भरतीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून SSR मेडिकल असिस्टंट पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी joinindiannavy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. अर्ज १० एप्रिल २०२५ या तारखेपर्यंत करता येणार आहे.अर्ज करण्याअगोदर काही पात्रता निकषांना पात्र करणे आवश्यक आहे. या भरतीच्या संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेत या भरती संदर्भात सर्व निकष आणि तपशील नमूद आहे. त्यांना जाणून घेण्यासाठी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
अधियूसूचनेमध्ये नमूद शैक्षणिक पात्रता निकष अभ्यासले तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच बारावीचे शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादे संदर्भात असणाऱ्या निकषांनुसार, १ सप्टेंबर २००४ ते २९ फेब्रुवारी २००८ दरम्यानचा जन्म असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
या भरतीमध्ये उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. ५५० रुपये अर्ज शुल्क भरायचे असून उमेदवारांना १८% GST भरावी लागणार आहे. सर्व आरक्षित प्रवगातून येणाऱ्या उमेदवारांना सारखीच रक्कम निश्चित करण्यात आली आहे. अर्ज शुल्क ओपनलाईन स्वरूपात भरायचे आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.