फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अधीन असलेली एक प्रमुख वित्तीय संस्था आहे. संस्थेने वरिष्ठ विश्लेषक अधिकारी पदांसाठी थेट भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे कॉर्पोरेट रणनीती, भागीदारी, अंतर्गत लेखापरीक्षण आणि अर्थशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये संस्थेची कार्यक्षमता वाढवण्याचा उद्देश आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत.
अधिसूचनेमध्ये असणाऱ्या नमूद माहितीनुसार, उमेदवाराचे वय 1 ऑक्टोबर 2024 रोजी किमान 21 वर्षे आणि कमाल 40 वर्षे असावे. वयोमर्यादेत अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना 5 वर्षे, इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या श्रेणीनुसार 10 ते 15 वर्षांची सूट दिली जाईल. माजी सैनिकांना शासनाच्या नियमानुसार सवलत देण्यात येईल.
या भरतीसाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत होईल. प्रथम प्राप्त अर्जांमधून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यानंतर त्यांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम टप्प्यात कागदपत्र पडताळणी केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी NaBFIDच्या अधिकृत वेबसाइट www.nabfid.org ला भेट द्यावी. त्यानंतर “Careers” विभागात जाऊन Senior Analyst Recruitment 2025 पर्याय निवडावा. उमेदवारांनी वैध ईमेल ID आणि मोबाइल नंबरच्या सहाय्याने नोंदणी करावी. अर्ज भरताना सर्व आवश्यक माहिती अचूक भरावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. अर्जासोबत उमेदवारांनी रेझ्युमे, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि जात किंवा दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज सबमिट करण्याआधी ऑनलाइन पेमेंटद्वारे अर्ज शुल्क जमा करावे आणि त्यानंतर अर्ज अंतिमरित्या सादर करावा. विविध वर्गांसाठी अर्ज शुल्काची रक्कम विभिन्न आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ८०० रुपये भरायचे आहेत. OBC तसेच EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील अर्ज शुल्क म्हणून ८०० रुपये भरायचे आहेत. SC तसेच ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागणार आहेत. तसेच दिव्यांग उमेदवारांनाही सारखीच रक्कम ठरवण्यात आली आहे.
यशस्वीरीत्या अर्ज सादर झाल्यानंतर उमेदवारांनी त्याचा प्रिंटआउट घ्यावा. भरतीशी संबंधित अधिक तपशील आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.nabfid.org ला भेट द्यावी.