फोटो सौजन्य - Social Media
भारतीय पोस्टाच्या सेवांमध्ये काम करण्याची इच्छा अनेक जणं बाळगून असतात. जर तुम्ही देखील भारतीय पोस्टामध्ये काम करण्यास इच्छुक आहात तर तुम्ही नक्कीच या भरतीला लाभ घेऊ शकता. या भरतीच्या माध्यमातून विविध पदे भरण्यात येणार आहेत. भारतीय पोस्टाकडून दरवर्षी परीक्षा आयोजित केल्या जातात. या परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची भरती केली जाते. देशभरातून अनेक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असतात. भारतीय पोस्टातील विविध पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित केली जाते. या रिक्त पदांमध्ये ग्रामीण डाक सेवक (जीडीएस), ब्रांच पोस्ट मास्टर्स (बीपीएम), मल्टी टास्किंग स्टाफ, स्टेनोग्राफर तसेच असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरचा समावेश असतो. या भरती संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. तसेच उमेदवारांनी indiapost.gov.in/indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यात यावी.
भारतीय पोस्टाने या भारतीसंबंधित महत्वाची माहिती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ३० रिक्त पदे भरण्यात येणार आहे. अशामध्ये काही महत्वाच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक तसेच अर्ज कर्त्या उमेदवारांनी नियमित संकेतस्थळाची तपासणी करत राहावी. या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी काही अटी शर्तीची पूर्तता करणे बंधनकारक आहे. चला तर मग जाणून घेऊयात पात्रता निकष:
या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना या बाबी पात्र कराव्या लागणार आहेत. GDS पदासाठी अर्ज कर्ता उमेदवार किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ४० वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांनादेखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करता उमेदवार गणिक आणि विज्ञान विषयांसह १० वी उत्तीर्ण हवा.
तसेच स्थानीय भाषेत कौशल्य असणे फार महत्वाचे आहे. त्याचबरोबर मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी अर्ज कर्ता उमेदवार किमान १८ वर्षे आयु असणे आवश्यक आहे. तसेच जास्तीत जास्त आयु २५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. स्टेनोग्राफर ग्रेड-I च्या पदासाठीदेखील किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यालयातून पदवीधर असणाऱ्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या परीक्षेसाठी उपस्थित राहणारे उमेदवार प्रवेश पत्र ऑनलाईन डाउनलोड करू शकतात. भारतीय पोस्टच्या संकेतस्थळावर जाऊन हे डाउनलोड करता येणार आहे. परीक्षेच्या अगोदर प्रवेशपत्र जाहीर करण्यात येईल.