JEE Main 2025 Admit Card: 22 जानेवारीला सुरु होणार परिक्षा; हॉलतिकीट केव्हा मिळणार, जाणून घ्या
JEE परिक्षेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. जेईई मुख्. परिक्षा 2025 मधील पहिल्या सत्रातील परिक्षा २२ जानेवारी पासून सुरु होणार असल्याचं जाहीर झालं आहे. याचपार्श्वभूमीवर आता परिशक्षेच्या हॉलतिकीट बाबत मोठी माहिती समोर आली आहे. परिक्षेचं हॉलतिकीट कसं आणि कुठे मिळेल जे जाणून घ्या…
अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची परिक्षा म्हणजे JEE. यंदाच्या वर्षातील पहिल्या सत्राची परिक्षा २२ जानेवारी पासून सुरु होणार आहे. यासंदर्भात अधिकची माहिती jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. JEE परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून हॉलतिकिट बाबत माहिती देण्यात आली आहे. JEE परिक्षेच्या विद्यार्थ्यांना परिक्षेच्या तीन दिवस आधी हॉलतिकीट मिळणार असल्याचं सांगितलं आहे. विद्यार्थ्यांना हॉलतिकीट अधिकृत संकेतस्थळावर मिळणार असल्याचं सांगितलं आहे. परिक्षेच्या तीन दिवस आधी म्हणजेच 19 जानेवारीला हॉलतिकीट जारी केलं जाईल असं सांगण्यात आलं आहे.
BE/B.Tech पेपर 1 साठी JEE मुख्य 2025 पहिल्या सत्रातील परीक्षा 22, 23, 24, 28 आणि 29 जानेवारी या दिवसांत होणार आहे. ही परिक्षा दोन भागांत विभागली जाणार आहे. ही परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे.दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी ३ ते ६ या वेळेत परीक्षा होणार आहे.तर पेपर २ B.Arch/B.Planning ची परीक्षा 30 जानेवारी रोजी दुपारी 3 ते 6:30 या वेळेत एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर हॉलतिकिट दिसेल. NTA ने जारी केलेल्या माहिती बुलेटिननुसार, NTA प्रत्येक परीक्षेच्या तारखेच्या तीन दिवस आधी प्रवेशपत्र जारी करेल. 22 जानेवारीला हजर झालेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र 19 जानेवारीला जारी केले जाईल.तर 23 जानेवारीला परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट 20 जानेवारीला आणि 24 जानेवारीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र 21 जानेवारीला जारी केले जाणार आहेत.28 जानेवारीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र 25 जानेवारीला आणि 29 जानेवारीच्या परीक्षेसाठी 26 जानेवारीला प्रवेशपत्र जारी केले जाईल.