फोटो सौजन्य - Social media
इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलोपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडीया (IRDAI)मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या भरती प्रक्रियेमध्ये असिस्टंट मॅनेजरच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. एकूण ४९ जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली गेली होती. मुळात, या भरती प्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले आहे. लवकरच, या भरतीसाठी आयोजित असलेल्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. तसेच उमेदवारांना त्याचे प्रवेश पात्र मिळवता येणार आहे.
हे देखील वाचा : इंजिनिअरिंग केलंय पण मिळत नाहीये काम; ‘या’ कोर्सपासून मिळवाल नोकरी, कमवाल लाखोंचा दाम
जर तुम्हीदेखील या भरतीसाठी अर्ज केले आहे. तर लक्षात असू द्या कि, IRDAI ने आयोजित केलेल्या असिस्टंट मॅनेजर पदासाठी असलेल्या भरतीमध्ये नियुक्त होण्यासाठी परीक्षा देणे अनिवार्य आहे. या परीक्षेत पात्र उमेदवाराला नियुक्तीस पात्र घोषित केले जाणार आहे तसेच दस्तऐवजांची पडताळणीसारखे टप्पे उमेदवाराला पात्र करणे बंधनकारक आहे. नोव्हेंबरच्या ६ तारखेला प्रिलिम्स परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या संबंधित प्रवेश पात्र मिळवण्यासाठी उमेदवारांना IRDAI च्या irdai.gov.in. या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
IRDAI च्या या भरती प्रक्रियेला २१ ऑगस्ट २०२४ ला सुरवात करण्यात आली होती. उमेदवारांना २० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. प्रिलिम्स परीक्षानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. मुख्य परीक्षा २१ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासंबंधित असलेल्या प्रवेशपत्राची सूचना लवकरच सुनावण्यात येईल. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारण्यात आले होते. SC, ST तसेच PWD कॅटेगरीतून येणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये रजशुल्क भरावे लागले होते. तर इतर आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ७५० रुपयांइतकी रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागली होती.
२१ वर्षे ते ३० वर्षे वयोगातील तरुणांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. एकंदरीत, या भरती प्रक्रियेमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला आहे. निवड प्रक्रियेला सुरुवात झाली असून ५ टप्प्यांमध्ये नियुक्तीची प्रक्रिया पार पडणार आहे. प्रिलिम्स लेखी परीक्षा, मुख्य लेखी परीक्षा, मुलाखत, दस्तऐवजांची पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणीच्या माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.