JEE Main Registration 2025: JEE मुख्य परीक्षेसाठी लवकरच अर्ज करा, या दिवशी बंद होणार एप्लीकेशन विंडो
जेईई मेन परीक्षेची अर्ज प्रक्रिया पुढील आठवड्यात संपणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे 22 नोव्हेंबर 2024 रोजी संयुक्त प्रवेश मुख्य परीक्षा सत्र एकसाठी अर्जाची विंडो बंद केली जाणार आहे. परीक्षेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://jeemain.nta.nic.in/online-application-form-for-jee-main-2025 ला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे.
करिअरसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
शेवटच्या क्षणी सर्व्हरवर लोड वाढल्याने अनेक वेळा अर्ज करण्यामध्ये विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात, त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता अर्ज त्वरित भरून सादर करावा. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की JEE मुख्य परीक्षेचे शुल्क फक्त नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे ऑनलाइन भरता येईल. जेईई मुख्य परीक्षेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. (फोटो सौजन्य – pinterest)
JEE मुख्य सत्र 1 ची परीक्षा 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. अधिकृत माहितीनुसार, JEE मुख्य परीक्षा 22 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत घेतली जाईल. परीक्षा सिटी स्लिप जानेवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल. परीक्षेचे एडमिट कार्ड परीक्षेच्या वास्तविक तारखेच्या तीन दिवस आधी वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही परीक्षा 13 भाषांमध्ये होणार आहे.
जेईई मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट दिली पाहिजे. आता, होम पेजवर उपलब्ध असलेल्या JEE मेन 2025 सत्र 1 नोंदणी लिंकवर क्लिक करा. एक नवीन पेज ओपन होईल, जिथे उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल. एकदा नोंदणी पूर्ण झाल्यावर, अकाऊंटमध्ये लॉग इन करा. आता तुम्हाला अर्ज आणि अर्ज फी भरणयाचा पर्याय मिळेल. अर्ज आणि अर्ज पी भरल्यानंतर सबमिट वर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा. पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.
JEE मुख्य सत्र एक परीक्षेचे एडमिट कार्ड अधिकृत वेबसाइट https://jeemain.nta.nic.in वर प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवार पोर्टलला भेट देऊन ते डाउनलोड करू शकतात. यासाठी उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि पासवर्ड यांसारखे आवश्यक डिटेल्स प्रविष्ट करावे लागतील. यानंतर तुमच्या स्क्रीनवर हॉल तिकीट दिसेल.
JEE मुख्य परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाईल ज्यात इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओरिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 28 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झाली जी 22 नोव्हेंबर रोजी संपत आहे. जानेवारीत परीक्षा होणार आहे.