फोटो सौजन्य - Social media
प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे शैक्षणिक बोर्ड आहेत, जे १०वी तसेच १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा आयोजित करतात. दरवर्षी या परीक्षेत लाखोंच्या संख्येत विद्यार्थी सहभागी होतात. चांगली बाब म्हणजे बोर्डाच्या परीक्षेत वाढणारी विद्यार्थ्यांची संख्या भारताच्या वाढत्या लिटरेसी रेटला दर्शवते. प्रत्येक राज्यांचे स्वतःचे असे वेगवेगळे बोर्ड असल्याने राज्यातील शिक्षण पद्धतीत तसेच अभ्यासक्रमात मोठा फरक पाहिला जातो. बोर्ड वेगेवेगळे असल्याने परीक्षेतील प्रश्नसंचही वेगवेगळे असतात.
मुख्य बाब म्हणजे एनसीईआरटीने सगळ्या राज्यांतील SSC तसेच HSC बोर्ड परीक्षांचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून कोणत्या राज्याची बोर्ड परीक्षा भारतातील सगळ्यात कठीण बोर्ड परीक्षा आहे? याचे उत्तर मिळाले आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातून तुमची SSC आणि HSC क्लिअर केली आहे तर स्वतःला भाग्यशाली समजा. कारण, महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड आयोजित परीक्षेत कठीण प्रश्नांचा ५३.५७% वापर केला गेला आहे, जो संपूर्ण भारतात दुसऱ्या स्थानी आहे.
हे सुद्धा वाचा: UPSC ची कमान नवीन अधिकाऱ्याच्या हातात; प्रीती सुदान यांची अध्यक्षपदी नियुक्ती
तर पहिल्या क्रमांकावर त्रिपुरा राज्यातील त्रिपुरा माध्यमिक शिक्षण बोर्ड असून प्रश्नसंचात कठीणतेची टक्केवारी ६६.६% इतकी आहे. यानंतर गोवा बोर्ड (44.66%), छत्तीसगड माध्यमिक शिक्षण बोर्ड (44.44%) आणि पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण बोर्ड (33.33%) यांचे स्थान आहे. विश्लेषकांनी भारतातील १७ राज्यातील बोर्डांच्या प्रश्नसंचांचा अभ्यास करत, त्यांना कठीण प्रश्न आणि सोपे प्रश्न या दोन भागात विभागले आहेत.
विश्लेषकांच्या अनुसार, सोपे प्रश्न ते असतात ज्यांची उत्तरे योग्यरित्या देणे अपेक्षित असते. तर कठीण प्रश्न म्हणजे अशी प्रश्न ज्यांचे उत्तर देताना विद्यार्थ्यांचा घाम निघतो. एकंदरीत, कठीण प्रश्नात त्या प्रश्नांचा समावेश केला गेला ज्यांचे उत्तर मिळण्याचे प्रतिशत खूप कमी असतात. विश्लेषणात दिसून आले आहे कि हरियाणा, गोवा, हिमाचल प्रदेश तसेच ओडिशा राज्यात बोर्ड विद्यार्थ्यांच्या पाठांतराची क्षमता तपासतो, तर उत्तर प्रदेश, नागालँड, त्रिपुरा तसेच केरळ राज्यातील बोर्ड विद्यार्थ्यांच्या समजण्याच्या शैलीला पारखतो.