फोटो सौजन्य - Social Media
UPSC च्या अध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती सुदान यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे UPSC च्या नव्या अध्यक्षा प्रीती सुदान यांना ३७ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी IAS सह इतर विभागातदेखील आपली छाप उमटवली आहे. UPSC चे माजी अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर प्रीती सुदान यांची नियुक्ती केली गेली आहे. नव्या अध्यक्षा कशा असतील? या गोष्टीकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.
१९८३ साली, प्रीती सुदान यांनी UPSC क्रॅक केली. यानंतर त्यांची आंध्रप्रदेश येथील कॅडरच्या IAS पदी निवड झाली. इतकेच नव्हे तर प्रीती सुदान यांना बहुतेक सरकारी क्षेत्रात तगडा अनुभव आहे. चार वर्षांपूर्वीच त्या रिटायर झाल्या. केंद्र सरकारच्या बाळ विकास मंत्रालयात त्यांची छाप कायम आहे, तर त्यांनी रक्षा मंत्रालयामध्ये सचिव म्हणून देखील काम केले आहे. तसेच खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभाग आणि शासनाच्या स्वास्थ्य विभागामध्ये सचिव म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. भारतीय स्वास्थ्य विभागात सचिव पदी त्यांचा कार्यकाळ २०१७ ते २०२० म्हणजेच अवघ्या ३ वर्षांचा होता. विशेष म्हणजे त्यांनी COVID १९ च्या महामारी काळात स्वास्थ्य विभागातील प्रमुख रणनीतीकार म्हणून भूमिका बजावली. इतकेच नव्हे तर त्यांनी वर्ल्ड बँकेच्या सल्लागार म्हणून देखील कामे केली आहेत.
हे सुद्धा वाचा: २८९ व्या रँकने झाला UPSC उत्तीर्ण; IPS अधिकारी उत्तमराव वादाच्या रिंगणात
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाचे कामे केली आहेत. ज्या कामांची दखल आंतरराष्ट्रीय दर्ज्यावर देखील घेतली गेली आहे. बेटी बचाव, बेटी पढाओ तसेच आयुष्यमान भारत मिशनसारख्या योजनेत त्यांनी प्रामुख्याची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय चिकित्सा आयोग तसेच एलाइड हेल्थ प्रोफेशनल आयोगाच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी ई-सिगरेट वर प्रतिबंध लावण्याची मागणीदेखील केली होती.