Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : भारतीय वायू दलात अभियंत्यांसाठी मोठ्या संधी; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायू दल अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन

भारतीय वायुदलामध्ये अभियंत्यांना विविध तांत्रिक, अतांत्रिक आणि कार्यालयीन पदांच्या आकर्षक करिअर संधी असून, वर्षभर वायुदलाकडून विविध भरती होत असतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 17, 2026 | 05:19 PM
Kolhapur News : भारतीय वायू दलात अभियंत्यांसाठी मोठ्या संधी; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायू दल अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन
Follow Us
Follow Us:
  • भारतीय वायू दलात अभियंत्यांसाठी मोठ्या संधी
  • डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायू दल अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन
कोल्हापूर :  (वा.) भारतीय वायुदलामध्ये अभियंत्यांना विविध तांत्रिक, अतांत्रिक आणि कार्यालयीन पदांच्या आकर्षक करिअर संधी असून, वर्षभर वायुदलाकडून विविध भरती होत असतात. देशसेवेची संधी देणाऱ्या वायुदलातील करिअरकडे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी वळावे, असे आवाहन स्क्वाडून लीडर राजन अरोरा, फ्लाइट लेफ्टनंट गुरजित सिंग भूलर यांनी केले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘भारतीय वायुदलातील करिअर संधी’ बाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) कार्य, वायूसैनिकांचा गणवेश, विविध लढाऊ विमाने इतकेच नाही तर प्रत्यक्ष विमान चालवण्याचा आभासी अनुभव घेण्याची संधी विद्याथ्यर्थ्यांना मिळाली. भारतीय वायुसेनेची (आयएएफ) विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि करिअर म्हणून त्यानी या सेवेकडे वळावे या हेतूने आयएएफने तयार केलेल्या ‘इंडक्शन पब्लिसिटी एक्झीबीशन व्हेईकल’ या व्होल्वो व्हॅन (आयपीईव्ही) च्या माध्यमातून देशभर जनजागृती कार्यक्रम राबवला जात आहे.

1100 हून अधिक विद्यार्थ्यांनी दर्शवली उपस्थिती
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट विभागाच्यावतीने बुधवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वायुसेनेच्या अधिकाऱ्यानी विद्यार्थ्यांना वायूसेनेतील संधी व करिअरबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी 1100हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात दाखल झालेल्या या व्होल्वो व्हॅनमध्ये वायूदलाशी संबधित मॉडेल्सची मांडणी करण्यात आली होती. यामध्ये ए.आर. आणि व्ही. आर. तंत्रज्ञांच्या माध्यमातून भारतीय वायू दलाचे अंतरंग उलगडण्यात आले आहेत. प्रत्यक्ष युद्ध व अन्य आपत्कालीन स्थितीत वापरली जाणारी विविध लढाऊ विमाने, युवक केंद्रित विविध गॅझेट, गणवेश, वापरले जाणारे तंत्रज्ञान यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे सिम्युलेटरच्या माध्यमातून प्रत्यक्ष विमान चालवण्याचा अभूतपूर्व अनुभव विद्यार्थ्यांना यावेळी घेता आला.

Maharashtra Board Result 2026: 10 वी आणि 12 वीचा निकाल ‘या’ दिवशी लागण्याची शक्यता, संभाव्य तारखा आल्या समोर

करिअर व देशसेवा अशा दोन्ही संधी
स्क्वाड्रन लीडर राजन अरोरा आणि फ्लाइंग लेफ्टनंट गुरजीत सिंग भुल्लर, फ्लाईंग ऑफिसर ए. यादव, वारंट ऑफिसर देवेश कुमार यांच्या पथकाने विद्यार्थ्यांना यावेळी वायू दलातील करिअरविषयक सविस्तर माहिती दिली. वर्षातून दोन वेळा भारतीय वायुदलाकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाते. विद्यार्थ्यांना एअरफोर्स अकॅडमी आणि एअर फोर्स टेक्निकल कॉलेज येथे प्रशिक्षण दिले जाते, शॉर्ट सर्व्हिस कमिशन तसेच पर्मनंट कमिशन या दोन्हीमध्ये गौरवपूर्ण देशसेवा करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध असल्याचे त्यानी सांगितले.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, सीडीसीआर- ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागचे अधिष्ठाता प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर मकरंद काईगडे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

TCS कडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! आता कोणाचाही Job जाणार नाही; नोकरकपात थांबवली, पगारातही होणार मोठी वाढ?

Web Title: Kolhapur news big opportunities for engineers in indian air force d y patil guidance from air force officers in engineering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

HPCL चा मोठा मान! भारतातील टॉप 20 सर्वात मूल्यवान ब्रँड्समध्ये समावेश; सलग दुसऱ्या वर्षी बाजी
1

HPCL चा मोठा मान! भारतातील टॉप 20 सर्वात मूल्यवान ब्रँड्समध्ये समावेश; सलग दुसऱ्या वर्षी बाजी

30 वर्षांचा विश्वास आणि ऐतिहासिक यश! Royal Stag चा जागतिक रेकॉर्ड, जगातील सर्वाधिक विक्री होणारा ठरला व्हिस्की ब्रँड
2

30 वर्षांचा विश्वास आणि ऐतिहासिक यश! Royal Stag चा जागतिक रेकॉर्ड, जगातील सर्वाधिक विक्री होणारा ठरला व्हिस्की ब्रँड

बाप रे! ‘ही’ पँट घातली की सरळ हॉस्पिटल गाठावं लागेल? Zara च्या नव्या ट्राउझरमुळे कित्येकांचे तुटले पाय; नक्की मॅटर काय?
3

बाप रे! ‘ही’ पँट घातली की सरळ हॉस्पिटल गाठावं लागेल? Zara च्या नव्या ट्राउझरमुळे कित्येकांचे तुटले पाय; नक्की मॅटर काय?

Business Ideas : गावातून लक्षाधीश बना! कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हे’ 20 बिझनेस; 16 व्या नंबरची भन्नाट आयडिया
4

Business Ideas : गावातून लक्षाधीश बना! कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हे’ 20 बिझनेस; 16 व्या नंबरची भन्नाट आयडिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.