Middle East War : इराण युद्धाचा मोठा फटका! सौदी अरेबियात हजारो उमराह यात्री अडकले; उड्डाणे रद्द झाल्याने घरी परतण्याचा मार्ग बंद (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
इराण युद्धाचा सर्वाधिक फटका इंडोनेशियाच्या यात्रेकरुंना बसला आहे. इंडोनेशियाचे सुमारे ५८,८६० हून अधिक यात्रेकरु सौदी अरेबियात अडकले आहेत. लोकांच्या राहण्याचा आणि परतीचा खर्च वाढला आहे. सध्या सौदी सरकार सर्व यात्रेकरुंना दिलासा देण्याचा आणि त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय सुरक्षेच्या कारणास्तव अनेक लोकांना यात्रा पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मलेशियाच्या यात्रेकरुंचीही समान स्थिती आहे. सुमारे १,६०० यात्रेकरु जेद्दाह आणि मदीनामध्ये अडकले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी मलेशियाने एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. मलेशिया एअरलाइन्सने नागिरकांना युद्धग्रस्त भागांतून सुरक्षित परत आणण्यासाठी तात्पुरती विमानसेवा सुरु केली आहे.
सध्या युद्धाच्या भीतीमुळे यात्रेकरुवर मानसिक ताण आला आहे. यात्रेकरुंनी तीव्र उद्वेग व्यक्त केला आहे. फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे १२ मार्चपर्यंत हॉटेलचा खर्च यात्रेकरुंना करावा लागणार आहे. परंतु अनेक यात्रेकरुंची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुरेसे पैसे उरलेले नाहीत.
अनेक यात्रेकरु जीव धोक्यात घालून घरी परत जाण्याचा मार्ग अवलंबत आहेत. तसेच स्फोटांच्या बातम्यामुळे अनेकांची घरी असलेल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी वाढली आहे. युद्धाचा रमजानवरही परिणाम झाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात अनेक मुस्लिम लोक उमरासाठी येतात. मात्र युद्धामुळे त्यांचा घरी रमजान साजरा करण्याच्या आंनदावर विरजन आले आले.
सध्या मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम हा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे जागतिक तेल बाजारावर परिणाम झाला आहे. तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच शेअर बाजारावरही परिणाम झाला आहे.
Ans: मध्यपूर्वेत सुरु असलेल्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे सौदी अरेबियात अडकले आहेत.
Ans: इंडोनेशियाचे सुमारे ५८,८६० हून अधिक यात्रेकरु, तर मलेशियाचे सुमारे १,६०० यात्रेकरु जेद्दाह आणि मदीनामध्ये अडकले आहेत.
Ans: युद्धामुळे उमराह यात्रेकरुंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. यात्रकरुंचा घरी परतण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच राहण्याचा खर्चात वाढ झाली आहे.






