फोटो सौजन्य - Social Media
भारत पेट्रोलियममध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. उमेदवारांना भारत पेट्रोलियमसारख्या अग्रगण्य कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्या संबंधित अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. जूनियर एक्झिक्युटिव्ह आणि सचिव पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार पात्रता तपासून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू राहील. उमेदवार भारत पेट्रोलियमच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
उमेदवारांना अर्ज करण्याअगोदर काही शैक्षणिक तसेच वयोमर्यादेची संदर्भात जाहीर करण्यात आलेले निकष पात्र करावे लागणार आहेत. एकंदरीत, जूनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी उमेदवाराकडे रसायनशास्त्र विषयातील B.Sc पदवी असावी. यात ऑर्गेनिक, फिजिकल, इनऑर्गेनिक किंवा अॅनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये विशेषज्ञता असावी आणि ही पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची असावी. किमान 60% गुण आवश्यक आहेत, तर SC, ST आणि PwBD उमेदवारांसाठी हे प्रमाण 55% असेल. याशिवाय, उमेदवाराकडे रासायनिक अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा असावा, ज्यात किमान 60% गुण असावेत. SC, ST आणि PwBD उमेदवारांसाठी हे प्रमाण 55% असेल. तसेच, उमेदवाराकडे पेट्रोलियम, ऑईल अँड गॅस किंवा पेट्रो-केमिकल उद्योगातील प्रयोगशाळेत किमान 5 वर्षांचा अनुभव असावा.
सचिव पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची 3 वर्षांची पदवी असावी. तसेच, इयत्ता 10वी आणि 12वीत किमान 70% गुण असावेत. SC, ST आणि PwBD उमेदवारांसाठी हे प्रमाण 65% असेल. उमेदवाराकडे सचिवालयीन, PA किंवा एग्जीक्युटिव्ह असिस्टंट म्हणून काम करण्याचा किमान 6 महिन्यांचा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, या पदासाठी उमेदवाराकडे किमान 5 वर्षांचा कार्यानुभव असावा.
दोन्ही पदांसाठी उमेदवाराचे कमाल वय 29 वर्षे असावे. तसेच, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. एकंदरीत, अर्जासाठी 1180 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे, मात्र SC, ST आणि PwBD उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट आहे.
निवड प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये केली जाऊ शकते. यामध्ये अर्जांचे स्क्रीनिंग, लेखी किंवा कंप्युटर आधारित परीक्षा, केस स्टडी चर्चा, गटकार्य आणि व्यक्तिगत मुलाखत यांचा समावेश असेल. अंतिम निवड प्रक्रियेबाबत माहिती प्राप्त अर्जांच्या संख्येवर आधारित ठरवली जाईल. अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पहा आणि लवकर अर्ज करा. अर्ज करण्याअगोदर सखोल माहिती मिळवण्यासाठी अधिसूचनेचा नक्की आढावा घेण्यात यावा.