Maharashtra MBBS BDS Admission 2026-27: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
महाराष्ट्रात डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजेच CET Cell ने 2026-27 या वर्षाची MBBS आणि BDS ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. यंदा जवळपास सगळ्या जागा भरल्या आहेत.
राज्यात एकूण 99 वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये आहेत. यामध्ये MBBS आणि BDS मिळून एकूण 11,431 जागा होत्या. त्यापैकी 11,293 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. म्हणजेच 98.79 टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. आता फक्त 138 जागा शिल्लक आहेत. सरकारी कॉलेजमध्ये तर 100% प्रवेश झाले आहेत. Maharashtra MBBS BDS Admission 2026-27:
गेल्या वर्षीपर्यंत काय होत होतं, CET Cell फक्त तीन फेऱ्यांमध्ये प्रवेश करायचा. त्यानंतर जी काही जागा शिल्लक राहायची, ती कॉलेज स्वतः भरायचे. याला संस्थास्तरीय फेरी म्हणतात. पण यात अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी यायच्या. कुणाला जास्त पैसे मागितले, कुणाचा नंबर असूनही प्रवेश मिळाला नाही, अशा तक्रारी CET Cell कडे येत होत्या.हीच बाब लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने यंदा नियम बदलला. सरकारने ठरवलं की सर्व प्रवेश CET Cell नेच करायचे. कोणत्याही कॉलेजला स्वतःहून प्रवेश देता येणार नाही.
त्यामुळे यंदा तीन मुख्य फेऱ्या आणि नंतर रिक्त जागांसाठी आणखी तीन फेऱ्या अशा एकूण सहा फेऱ्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. याचा फायदा असा झाला की एकाही विद्यार्थ्याची तक्रार आली नाही. सगळं काम पारदर्शक पद्धतीने झालं.
MBBS साठी राज्यात एकूण 70 कॉलेज आणि विद्यापीठे आहेत.
सरकारी कॉलेज – राज्यात 43 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यात 5,065 जागा होत्या आणि सर्वच्या सर्व 100% भरल्या आहेत. एकही जागा रिकामी नाही.
खासगी कॉलेज – 25 खासगी कॉलेजमध्ये 3,299 जागा होत्या. त्यापैकी 3,260 जागांवर प्रवेश झाले असून फक्त 39 जागा रिकाम्या आहेत.डीम्ड
विद्यापीठ – 2 मोठ्या खासगी विद्यापीठांमध्ये 450 जागा होत्या, त्यापैकी 405 जागा भरल्या आहेत आणि 45 जागा शिल्लक आहेत.
एकूण विचार केला तर MBBS च्या 8,814 जागांपैकी 8,730 जागा भरल्या आहेत. म्हणजेच 99.04% MBBS प्रवेश पूर्ण झाले आहेत. फक्त 84 जागा शिल्लक आहेत.
BDS म्हणजेच दातांच्या डॉक्टरच्या अभ्यासक्रमासाठी पण जवळपास सगळ्या जागा भरल्या आहेत.सरकारी कॉलेज – 5 सरकारी दंत महाविद्यालयांमध्ये 317 जागा होत्या. त्यापैकी 315 जागांवर प्रवेश झाले आहेत. फक्त 2 जागा रिकाम्या आहेत. म्हणजेच 99.36% प्रवेश.
खासगी कॉलेज – 23 खासगी दंत महाविद्यालयांमध्ये 2,200 जागा होत्या. त्यापैकी 2,178 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. फक्त 22 जागा शिल्लक आहेत.
MBBS आणि BDS दोन्ही मिळून राज्यात आता फक्त 138 जागा उरल्या आहेत. त्यापण खासगी आणि डीम्ड कॉलेजमधल्याच आहेत.एकंदरीत यंदाची प्रवेश प्रक्रिया अतिशय शांततेत आणि व्यवस्थित पार पडली आहे. ऑनलाईन सहा फेऱ्या घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप दिलासा मिळाला आहे
Ans: एकूण ११,४३१ जागांपैकी ११,२९३ जागांवर प्रवेश झाले आहेत.
Ans: एकूण ९८.७९ टक्के जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत.
Ans: सरकारी महाविद्यालयांतील सर्व ५,०६५ जागा भरल्या आहेत.






