फोटो सौजन्य- iStock
मुंबई महानगरपालिकेकडून कार्यकारी सहायक ( लिपिक) पदाकरिता 1846 जागांसाठी भरतीप्रकिया राबिवली जात आहे. या भरतीप्रक्रियेसंबंधी काही अटी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. नवीन जाहिरातीनुसार आता उमेदवारांना 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
या अटी रद्द करण्यात आल्या
महापालिकेकडून सुधारित अर्हतेनुसार अर्ज मागविण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आता 11 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. याआधी पात्र उमेदवारांनी अर्ज केले असतील तर त्यांना अर्ज करण्याची गरज नाही.
वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी- किमान 18 ते 38 वर्षे
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी- किमान 18 ते 43 वर्षे
अर्ज शुल्क (वस्तू व सेवाकरासह)
खुला प्रवर्ग – 1000 रुपये
राखीव प्रवर्ग- 900 रुपये
वेतन
निवड झालेल्या उमेदवारांना 25500 रुपये ते 81100 रुपये दरमहा वेतन असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्जप्रक्रिया
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती भरा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/ ला भेट द्या.