Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Experiential Learning: वर्गखोलीऐवजी थेट शेतात अभ्यास? भारतातील ‘या’ राज्यातील शाळा शिक्षण पद्धतीत काय मोठा बदल घडवत आहेत?

भारतातील काही शाळा पारंपरिक वर्गखोल्या सोडून मुलांना जंगल आणि शेतात प्रत्यक्ष अनुभव आधारित शिक्षण (Experiential Learning) देत आहेत. नवीन शैक्षणिक धोरण आणि या मॉडेलचे फायदे येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 23, 2026 | 12:22 PM
nature learning

nature learning

Follow Us
Follow Us:

Experiential Learning: भारतात शिक्षणाचा अर्थ प्रदीर्घ काळापासून केवळ वर्गखोली, फळा आणि जाड पुस्तकांपुरताच मर्यादित मानला गेला. परंतु, आता देशातील काही शाळा ही विचारसरणी पूर्ण पणे बदलत आहेत. आता मुले झाडे-झाडोरा, माती, शेती, नदीकिनारा आणि खुला निसर्ग यांच्या सानिध्यात राहून शिकत आहेत. या अनोख्या शाळा देशभरात चर्चेचा विषय बनत असून लोक याकडे भविष्यतील शिक्षणाचे एक नवीन मॉडेल म्हणून पाहत आहेत.

देशातील अनेक राज्यांमध्ये अशा शाळा चालवल्या जात आहेत. जिथे मुलांना निसर्गाच्या कुशीत शिकवले जाते. उत्तराखंड, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये काही शाळा या शेती आणि निसर्गाच्या सानिध्यात उभारल्या आहेत. या शाळांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवाद्वारे गोष्टी शिकवल्या जातात. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता (Creative Thinking) अधिक वेगाने वाढीस लागताना दिसत आहे.

Google AI Training: शिक्षकांसाठी गुगलचा नवा मोफत ‘AI’ ट्रेनिंग प्रोग्राम; आता वर्गात जेमिनी (Gemini) टूलचा वापर कसा होणार?

प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षणाची नवी पद्धत

या शाळांमध्ये शिक्षणाची पद्धत पारंपारिक शाळांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. येथे मुले गणित, विज्ञान आणि पर्यावरण यांसारखे विषय प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकतात. यामधील अनेक शाळांमध्ये बी पेरण्यापासून ते पीक कापणीपर्यंतच्या प्रक्रियेतून मुलांना हवामान, पाणी आणि सेंद्रिय शेतीची (Organic Farming) माहिती दिली जाते. अनेक मुले स्वत: रोपे लावतात, त्यांची काळजी घेतात. ज्यामुळे त्यांच्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढते.

अखेर का बदलत आहे शिक्षणाची पद्धत?

नवीन शैक्षणिक धोरण (NEP) लागू झाल्यानंतर आता ‘अनुभव आधारित शिक्षणावर’ (Experiential Learning) भर दिला जात आहे. अनेक संशोधनांमधून हे समोर आले आहे की, खुल्या वातावरणात शिकणाऱ्या मुलांची एकग्रता आणि शिकण्याची क्षमता वर्गात शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेत जास्त असते. म्हणूनच या मॉडेलला भविष्यात आधुनिक शिक्षण मानले जात आहे.

Success Story: जेईईमध्ये देशात अव्वल येणारा सुशांत सचदेवा आज ‘OpenAI’ मध्ये संशोधक; वाचा त्याचा थक्क करणारा प्रवास एका क्लिकवर..

हेच आहे का भविष्यातील शिक्षण?

शिक्षणतज्ञांच्या मते, येत्या काळात भारतातील अशा शाळांची संख्या आणखी वाढू शकते. आजच्या चार भिंतीमधील आणि स्क्रिनआधारित शिक्षणाऐवजी निसर्ग आधारित शिक्षण हे विद्यार्थ्यांना वास्तविक जगाशी जोडण्याचे काम करते. यामुळे मुले अभ्यासच करत नाहीत तर जीवन जगण्याची कलाही शिकतात. यामुळे येत्या काही वर्षात भारताच्या शिक्षण व्यवस्थेत हे मॉडेल मोठा बदल घडवून आणू शकते.

Web Title: Nature based schools india experiential learning nep forest farming education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Digital School
  • education
  • Natural Farming

संबंधित बातम्या

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
1

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
3

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
4

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.