Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई महापालिकेच्या CBSE शाळेत शिक्षक भरतीचा ‘पेच’; महिला मंडळाला कंत्राट देण्यावरून रणकंदन, विजय चौगुले आक्रमक

नवी मुंबई महिला उत्कर्ष मंडळ असे या महिला मंडळाचे नाव असून त्यांना शिक्षक नेमण्याचे काम दिले जाणार आहे. या बाबतचा प्रस्ताव येणाऱ्या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 17, 2026 | 06:12 PM
नवी मुंबई महापालिकेच्या CBSE शाळेत शिक्षक भरतीचा ‘पेच’; महिला मंडळाला कंत्राट देण्यावरून रणकंदन, विजय चौगुले आक्रमक
Follow Us
Follow Us:

 

  • नवी मुंबई महापालिकेच्या CBSE शाळेत शिक्षक भरतीचा ‘पेच’
  • महिला मंडळाला कंत्राट देण्यावरून रणकंदन
  • विजय चौगुले आक्रमक
नवी मुंबई (वा.): नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून महापालिकेच्या कोपरखैरणे येथील सीबीएसई बोर्डाच्या शाळेसाठी बाह्य पद्धतीने शिक्षक नेमण्यात येणार आहेत. या शिक्षक नेमणुकी साठी एका महिला मंडळाचे नाव समोर आले आहे. नवी मुंबई महिला उत्कर्ष मंडळ असे या महिला मंडळाचे नाव असून त्यांना शिक्षक नेमण्याचे काम दिले जाणार आहे. या बाबतचा प्रस्ताव येणाऱ्या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. त्यामुळे आत्ता शाळेतील शिक्षक महिला मंडळ नेमणार अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी आयुक्तांना पत्र देऊन या प्रस्तावाबाबत आयुक्तांनी खुलासा मागवावा. जोपर्यंत या प्रस्तावाबाबत इत्यंभूत माहिती उपलब्ध होत नाही तोपर्यंत या प्रस्तावाबाबत अंमलबजावणी करू नये अशी भूमिका विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी आयुक्तांकडे केली आहे.

निवडलेल्या शैक्षणिक संस्थेला कामाचा अनुभव आहे का?

अशा परिस्थितीत निवडलेल्या महिला मंडळ संस्थेला प्रत्यक्ष शैक्षणिक कामाचा अनुभव आहे का, याची स्पष्ट माहिती समोर आलेली नसल्याने या प्रस्तावावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात महापालिकेच्या शिक्षण विभागावर तीव्र टीका होत आहे. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याऐवजी ते संपूर्ण अंधारात टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ही या निमित्ताने केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, अंतिम वित्तीय मान्यता देण्यापूर्वी सविस्तर अंदाजपत्रक, वाढीव खर्चाचे कारणपत्र, सर्व निविदाकारांचे गुणांकन, निवडलेल्या संस्थेचा शैक्षणिक पूर्वानुभव, मसुदा करारनामा, दंडात्मक अटी, शिक्षकांची किमान पात्रता आणि मानधन संरचना ही सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्यात यावी.

स्व-मूल्यमापनासाठी शाळांना देण्यात आली मुदतवाढ; SQAAF अंतर्गत स्व-मूल्यमापन करणे बंधनकारक

शाळेत शिक्षक नेमणुकीची जबाबदारी एका महिला मंडळाकडे

महापालिकेच्या या सीबीएसई बोर्डाच्या शाळेत नेहमीच शिक्षकांची कमतरता राहिली आहे. त्यामुळे ही कोपर खैरने मधील शाळा नेहमीच वादात राहिली आहे. आणि आत्ता नवीनच शिक्षक भरतीचा वाद समोर आला आहे. शाळेत शिक्षक नेमणुकीची जबाबदारी एका महिला मंडळाकडे देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रस्तावात म्हटले आहे की सुरुवातीला १० वर्षांसाठी या कामासाठी ३३.६८ कोटींची मान्यता देण्यात आली होती. मात्र नंतर ती वाढून ३४.९८ कोटी इतकी करण्यात आली.  एवढ्या मोठ्या रकमेतील वाढ नेमकी का करण्यात आली हा पहिला प्रश्न यामुळे समोर आला आहे. पण शाळेतील शिक्षकांची नेमणूक करण्याचे काम महिला मंडळाकडे कोणत्या आधारावर दिले जात आहे असा प्रश्न यामुळे. उपस्थित झाला आहे. आणि सभेच्या आधीच हा प्रस्ताव चर्चेत आला आहे. विशेषतः हा विषय सी बी एस इ शाळेचा असल्याने येथे केवळ शिक्षकांची संख्या पुरेशी नाही, तर इंग्रजी माध्यमातील अध्यापन क्षमता, विषयविशेष पात्रता, सी बी एस इ पद्धतीचे ज्ञान, प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि शैक्षणिक गुणवत्ता यांना महत्त्व आहे. असे असताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिला मंडळाकडून सी बी एस इ शाळेसाठी शिक्षक भरती करण्याचा निर्णय शिक्षण मंडळ कोणत्या दबावाखाली घेत आहे असा सवाल ही शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी उपस्थित केला आहे.

Kolhapur News : भारतीय वायू दलात अभियंत्यांसाठी मोठ्या संधी; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायू दल अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन

Web Title: Navi mumbai nmmc cbse school teacher recruitment controversy vijay chaugule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • CBSC
  • Navi Mumbai
  • Student

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
1

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल
2

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल

Navi Mumbai: वर्षानुवर्षे एकाच आरोग्य केंद्रात ड्युटी; वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सच्या बदल्यांसाठी राष्ट्रवादी आक्रमक
3

Navi Mumbai: वर्षानुवर्षे एकाच आरोग्य केंद्रात ड्युटी; वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सच्या बदल्यांसाठी राष्ट्रवादी आक्रमक

APMC Market Building : वापर शून्य, तरीही 5.94 कोटींचा दणका! एपीएमसी बाजार समिती पुढे मोठा आर्थिक पेच
4

APMC Market Building : वापर शून्य, तरीही 5.94 कोटींचा दणका! एपीएमसी बाजार समिती पुढे मोठा आर्थिक पेच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.