फोटो सौजन्य - Social Media
एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC India Limited) ही भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाअंतर्गत असलेली एक “नवरत्न” सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. नुकतीच या कंपनीकडून बारसिंगसर प्रकल्प, बीकानेर (राजस्थान) येथे विविध अप्रेंटीस पदांसाठी भरती 2025 ची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत ITI ट्रेड, डिप्लोमा, ग्रॅज्युएट (इंजिनिअरिंग) आणि ग्रॅज्युएट (नॉन-इंजिनिअरिंग) अशा विविध गटांमध्ये उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे. ही संधी केवळ राजस्थान राज्यातील उमेदवारांसाठी आहे. तसेच 2021 ते 2025 या कालावधीत शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत.
या अप्रेंटीस भरतीत उमेदवारांना 1 वर्ष कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान पदानुसार मासिक मानधन दिले जाईल. ITI ट्रेड अप्रेंटीसना दरमहा ₹10,019, डिप्लोमा अप्रेंटीसना ₹12,524 आणि ग्रॅज्युएट अप्रेंटीस (इंजिनिअरिंग) उमेदवारांना ₹15,028 इतके मानधन देण्यात येईल. तर नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटीसना देखील दरमहा ₹12,524 इतका भत्ता मिळेल.
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणांच्या आधारे होणार आहे. उमेदवारांचे शैक्षणिक पात्रतेतील गुण विचारात घेतले जातील. त्यानंतर शॉर्टलिस्टिंग करून कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय तपासणी केली जाईल.
राजस्थानमधील आणि पात्रतेला पूरक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये. अधिक माहिती व अर्जासाठी अधिकृत वेबसाइट: www.nlcindia.in