फोटो सौजन्य - Social Media
महत्त्वाच्या तारखा निश्चित करण्यात आले आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू झाली आहे. तसेच शेवटची तारीखही प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2025 आहे म्हणजेच आज या भरतीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या सुवर्णभारतीच वेळीच फायदा घेण्यासाठी आज अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर निवड यादी 26 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर होईल.
उत्तरेकडील सेक्टरमध्ये 165, मुंबई सेक्टरमध्ये 569, पश्चिम 856, पूर्व 578, दक्षिण 322 आणि मध्य सेक्टरमध्ये 253 अशी एकूण 2743 पदे उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता निकष उमेदवारांना फॉलो करावे लागणार आहेत. अप्रेंटिस पदांसाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI, तंत्रज्ञ अप्रेंटिससाठी डिप्लोमा, तर ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी B.A., B.Com, B.Sc., B.B.A., B.E. किंवा B.Tech आवश्यक आहे. रसायनशास्त्र, अकाउंट्स, सिव्हिल, मेकॅनिकल, पेट्रोलियम आणि संगणक अभियांत्रिकी शाखांतील पदवीधरांना प्राधान्य दिले जाणार आहे. भरतीमध्ये उमेदवारांना एका ठरविक वयोमायदेत असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 6 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 24 वर्षांदरम्यान असावे. राखीव प्रवर्गांसाठी सरकारनुसार वयात सवलत देण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी ONGC च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्जाची अंतिम तारीख: 6 नोव्हेंबर 2025 (आज)






