फोटो सौजन्य - Social Media
बॉम्बे हायकोर्टमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. Bombay High Court तर्फे स्टेनोग्राफर (High Grade) या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा. मुंबईतील तरुण जर भरती होण्यास इच्छुक आहेत तर नक्कीच या भरतीचा लाभ त्यांनी घेणे आवश्यक आहे. पण तत्पूर्वी ही बातमी वाचा.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी असावी. मात्र, जर उमेदवार हायकोर्ट, इतर न्यायालय, न्यायाधिकरण किंवा महाधिवक्ता/सरकारी वकिलांच्या कार्यालयात किमान 5 वर्षे स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत असतील, तर त्यांना या अटीत सवलत मिळू शकते. तसेच, कायदा विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल.
टायपिंग आणि शॉर्टहँड पात्रता पाहिली तर शॉर्टहँड स्पीड प्रति मिनिट 100 शब्द निश्चित करण्यात आली आहे. इंग्रजी टायपिंग स्पीड प्रति मिनिट 40 शब्द निश्चित करण्यात आली आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
अधिक माहितीसाठी आणि भरतीसंबंधी सर्व अद्यतनांसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट द्यावी. शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे.






