फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) मध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली होती. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार होती. मुळात, या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आता काहीच काळ उरला आहे. १ नोव्हेंबर २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. काहीच काळ बाकी आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे. www.nhb.org.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. NHB च्या या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहीर या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
या भरती संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये या भरती प्रक्रियेविषयी काही अटी शर्ती नमूद आहेत. या अटी शर्ती उमेदवारांसाच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. तसचे काही ठराविक क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या अटी शर्ती अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. मुळात, अर्ज कर्ता उमेदवार मान्यता प्राप्त संस्थनांतून ICWAI/ ICAI/ CFA/ MBA या विषयांमध्ये पदवीधर असावा. वयोमर्यादेनुसार, मॅनेजरच्या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार किमान २३ वर्षे आयु असणारा असावा. तर जास्तीत जास्त ३५ वर्षे आयु असणारा उमेदावर या भरतीसाठी अर्ज करू शकतो. तर मॅनेजर स्केल २ च्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराची किमान आयु २३ वर्षे असावी. तर जास्तीत जास्त ३२ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल.
अशा प्रकारे करता येईल अर्ज
हे देखील वाचा : देवीच्या पावलांची रांगोळी काढण्यासाठी सोपी पद्धत जाणून घ्या
या भरतीच्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज शुल्काशिवाय केले गेलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाही. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करावे लागणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी करणाऱ्या अर्ज शुल्कात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. १७५ रुपये भरवायचे आहे. तसेच इतर आरक्षित प्रवर्गातून आणि श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क म्हणून ८५० रुपये भरावयाचे आहे. या भरती संबंधात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.