आता प्रवास होणार अधिक सोपा! रेल्वेच्या सर्व सेवा एकच ठिकाणी मिळणार, लवकरच लाँच होणार हे ॲप
दि नॉर्थ ईस्ट फ्रॉन्टिर रेल्वे (NFR) मध्ये भरतीला सुरुवाती झाली आहे. भारतीय रेल्वेमध्ये काम करण्यास इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) ने या भरतीच्या संदर्भांत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांना अप्रेंटिसशिप पुरवली जाणार आहे. ५,६४७ उमेदवारांना या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिसशिप पुरवण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसेच याच दिवसापासून या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना एका ठराविक काळापर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. उमेदवारांना nfr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : IDBI ESO भरती प्रक्रियेविषयी अधिसूचना जाहीर; idbibank.in येथे करता येणार अर्ज
गुवाहटीच्या RRC ने हि भरती आयोजली आहे. मुळात, या भरतीसाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना एका ठराविक कालखंडात या भरतीसाठी अर्ज करायचे आहे. भरतीमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ९१०० रुपयांचा स्टायपेंड दिला जाईल. संपूर्ण भारतभरात या भरतीला आयोजित केली गेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरच या भरतीसाठी जाहीर करण्यात आलेली अधिसूचना वाचून काढून भरतीसाठी अर्ज नोंदवावा. ३ डिसेंबर पर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. वेळेच्या बाहेर करण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. स्त्री असो वा पुरुष, इच्छा असल्यास दोघेही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. निवड प्रक्रियेत परीक्षेचा समावेश आहे. परंतु, परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही आहे.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज शुल्क काही ठराविक आरक्षित प्रवर्गातील उमेदवार वगळता प्रत्येकाला करावा लागणार आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच OBC आणि EWS आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना देखील अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरायचे आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. PWD तसेच महिला उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे.
हे देखील वाचा : उल्हासनगरमधील श्री चैतन्य टेक्नो शाळेने नोंदवला जागतिक विक्रम !
RRC ने काही अटी शर्ती जाहीर केल्या आहेत. या अटी शर्ती अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत. तर एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. किमान १८ वर्षे आयु आसलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २४ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. शैक्षणिक अटी नुसार, अर्ज करता उमेदवारांचे किमान शिक्क्षन दहावी उत्तीर्ण असावे आणि उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रामध्ये ITI प्रमाणपत्र असावे. अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचा.