फोटो सौजन्य - Social media
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने बँकिंग क्षेत्रामध्ये रोजगाराच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये आपले भवितव्य घडवण्याचा विचार करत आहात. तर या सुवर्णसंधीचा नक्कीच लाभ घ्या. एकूण ५८ रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदाचा विचार केला जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या भरती प्रक्रियेतून उमेदवारांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवले जात आहे. उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग होण्याची इच्छा असल्यास ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकतात. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भात SBI ने अधिकृत अधिसूचना जाहीर केली होती. यामध्ये या भरती प्रक्रियेसंदर्भातील सखोल माहिती नमूद आहे. तिचा आढावा घेण्यासाठी उमेदवारांनी SBI च्या sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
अधिसूचनेनुसार, उमेदवारांना अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SBI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. सप्टेंबरच्या २४ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. दिलेल्या मुदती अगोदर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज नोंदवण्याचे आवाहन SBI ने केले आहे. या अगोदर, उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र असणे अनिवार्य असणार आहे.
अर्ज कर्त्या उमेदवाराकडे B.E/B. Tech ची डिग्री असणे अनिवार्य आहे किंवा MCA/M. Tech/M.Sc ची डिग्रीही चालून जाईल. तसचे अर्ज कर्त्या उमेदवाराला संबंधित क्षेत्रामध्ये किमान ८ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. अधिसूचनेमध्ये वयासबंधित अट नमूद आहे. अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान वय २७ वर्षे इतके तर कमाल वय ४५ वर्षे इतके असणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा : BHEL मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती; त्वरित अर्ज करा, ‘या’ तारखेला होणार परीक्षा
उमेदवारांची नियुक्तीमध्ये काही निवड प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत. या निवडप्रकियेमध्ये लिखित परीक्षा तसेच मुलाखतीचा समावेश आहे. या दोन्ही प्रक्रियांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती केली जाईल. नियुक्त उमेदवाराला २९ लाख ते ४५ लाखांपर्यंतचा वार्षिक पॅकेज पुरवला जाईल. अर्ज करताना उमेदवारांनी लक्षात ठेवण्याची महत्वाची बाब म्हणजे कि उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. जनरल प्रवर्गातून उमेदवारांना ७५० यूप्यांचे अर्ज शुल्क म्हणून भुगतान करावे लागणार आहे. तर SC /ST तसेच PWD प्रवर्गातील उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही.