फोटो सौजन्य - Social Media
भारतीय नौदलामध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. भारतीय नौदलामध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतलेले परंतु देशाच्या संरक्षणाकरिता दिवस रात्र झटत असलेल्या भारतीय दलांमध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या संधीचे सोने करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे एसएसआर मेडिकल असिस्टंट पदी उमेदवाराची निवड केली जाणार आहे. एकंदरीत, भारतीय नौदलाने SSR मेडिकल असिस्टंट पदाच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेचे आयोजन केले आहे. या संधीच्या मध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सरकारी क्षेत्रात काम करता येणार आहे.
हे देखील वाचा : ठाणे महापालिकेत विविध पदांवर भरती सुरु; वाचा… काय आहे आवश्यक पात्रतेच्या अटी…
भारतीय नौदलातील SSR मेडिकल असिस्टंट पदाच्या रिक्त जागांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु झाली नाही. उमेदवारांना ७ सप्टेंबर २०२४ पासून अर्ज करता येणार आहे. एकंदरीत, ७ सप्टेंबरपासून उमेदवार अर्ज करण्यास सुरु करू शकतात, तर सप्टेंबरच्या १७ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर दिलेल्या वेळेत अर्ज करावा असे निर्देश भारतीय नौदलाने दिले आहेत. अर्ज करण्याची पद्धत पूर्णतः ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्याचबरोबर या संकेतस्थळावर अर्जासह भरती प्रकियेसंदर्भात सखोल माहितीही वाचता येईल.
भारतीय नौदलाच्या या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिसूचना त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उमेदवार त्याला पाहू शकतात आणि डाउनलोडही करू शकतात. मुख्य म्हणजे अनेक भरती प्रक्रियांमध्ये अर्ज करताना अर्ज शुल्क भरावे लागते. परंतु, या अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज करताना कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवाराला काही अटी शर्तींना पात्र असणे गरजेचे आहे. वयोमर्यादेच्या अटीनुसार, १ नोव्हेंबर २००३ ते ३० एप्रिल २००७ दरम्यान जन्म तिथी असणाऱ्या उमेदवारांनाच या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर उमेदवाराचे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून १० + २ ( बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स ) असणे गरजचे आहे. मुख्य म्हणजे यामध्ये उमेदवार किमान ५०% गुणांनी उत्तीर्ण असावा.
हे देखील वाचा : NIRF रँकिंग अनुसार दिल्लीतील टॉप 5 वैद्यकीय महाविद्यालय
उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये चार टप्प्यांचा समावेश आहे. निवड होण्यासाठी उमेदवाराला लिखित परीक्षा, फिजिकल टेस्ट, दस्तावेजांची तपासणी त्याचबरोबर मेडिकल टेस्टमध्ये उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला किमान २१,७०० ते कमाल ६९,१०० रुपयांपर्यंतचे वार्षिक वेतन मिळण्याची शक्यता आहे.