फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने (RRB)ने अधिसूचना जाहीर केली आहे. विविध लेव्हल १च्या पोस्टसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ३२,४३८ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. २१ डिसेंबर २०२४ रोजी या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी RRB च्या rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी २३ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज करावे. तसेच उमेदवारांना या भरतीसाठी २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावी लागणार आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांनाही अर्ज शुल्क म्हणून सारखीच रक्कम भरायची आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५० रुपये रक्कम भरायची आहे. PWD आणि ESM प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. उमेदवारांना २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
२५ फेब्रुवारी २०२५ ते ६ मार्च २०२५ पर्यंत उमेदवारांना फॉर्ममध्ये असलेल्या त्रुटी सुधारता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदरांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. या पात्रता निकषांमध्ये वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अटी शर्तीचा समावेश आहे. उमेदवारांना या अटी शर्ती पात्र करणे अनिवार्य आहे, त्याशिवाय अर्ज करता येणार आहे. अधिसूचनेमध्ये या निकषांचा समावेश आहे. किमान १८ वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त ३६ वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. Group-D च्या पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
या भरती संदर्भात आयोजित असलेल्या नियुक्तीच्या टप्प्यात ४ टप्पे उमेदवारांना पार करावे लागणार आहेत. उमेदवारांना लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. तसेच फिजिकल एफिशिअन्सी टेस्ट पात्र करावी लागणार आहेत. दस्तऐवजांची पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणीसह उमेदवारांना या चारही टप्य्यांना पात्र करत या भरतीसाठी नियुक्त होता येणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.