सौजन्य सोशल मिडीया
डॉ. जनार्दन वाघमारे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३४ रोजी लातूर जिल्ह्यात झाला. डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. शिक्षणतज्ज्ञ, साहित्य अभ्यासक आणि राजकारणी म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. ते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे (SRTMU) संस्थापक आणि कुलगुरू विद्यापीठाच्या स्थापनेपासून शैक्षणिक पायाभूत रचना उभारण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठवाड्यात उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण लेखन व संशोधन केले.
सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी परखड मांडणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेले असताना शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर म्हणून त्यांनी प्रभावी भूमिका मांडली. लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली होती. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या पार्थिवावर लातूर जिल्ह्यातच औसा तालुक्यातील कवठा या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
डॉ. वाघमारे हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (SRTMU) चे संस्थापक व पहिले कुलगुरू होते. विद्यापीठाच्या स्थापनेपासून शैक्षणिक पायाभूत रचना उभारण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठवाड्यात उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण लेखन व संशोधन केले. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी परखड मांडणी केली. डॉ. वाघमारे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राज्य सभेवर निवडून गेले होते. राज्यसभेतील कार्यकाळात त्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडली. तसेच लातूर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
डॉ. वाघमारे यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगाव कवठा (ता. औसा, जि. लातूर) येथे उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेले भरीव व दूरदृष्टीपूर्ण कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.






