फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) ने गेल्या काही महिन्यांगोदर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) साठी भरती प्रक्रियेला सुरूवात केली होती. मुळात, या भरतीसाठी मोठ्या संख्येत उमेदवारांनी अर्ज केले होते. या भरतीसाठी एकूण ८,११३ पदे रिक्त होती, त्यासाठी अर्ज प्रक्रिया आयोजित केली होती. एकूण चार टप्प्यांमध्ये उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यातील पहिला टप्पा CBT 1 म्हणजेच संगणकावर आधारित परिक्षा होती, जी २,१७७ उमेदवारांनी यशस्वीरित्या पार केली आहे. हा निकाल जर अद्याप तुम्ही नसेल तर अजूनही वेळ गेली नाही. तुम्हाला ते निकाल RRB च्या अधिकृत संकेसस्थळावर पाहता येणार आहे.
मुळात, CBT 1 चा निकाल तात्पुरता आहे. यामध्ये यश प्राप्त केलेल्या सर्वच उमेदवारांना पुढे जाऊन नियुक्ती मिळेल याची काही खात्री नाही. कारण त्यांना CBT 1 नंतर CBT २ परीक्षेला पात्र करावे लागणार आहे. या परीक्षेला पात्र उमेदवारांना दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी बोलवले जाईल. या पडताळणी दरम्यान जर काही त्रुटी आढळ्यास तर उमेदवाराला भरतीतून रद्द केले जाईल. दरम्यान उमेदवारांच्या कौशल्याला तपासण्यासाठी कौशल्य चाचणी आयोजित करण्यात येईल. एकदंरीत, CBT १, CBT 2, कौशल्य चाचणी आणि दस्तऐवजांची पडताळणी या चार टप्प्यांना यशस्वीरीत्या पात्र करणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी नियुक्त ग्राह्य धरले जाईल.
आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीमध्ये काही खास फायदा मिळणार आहे. रेल्वे शासनाने भरती संबंधित काही कट ऑफ जाहीर केली आहे. कॅटेगरी क्र. १ मध्ये अनारक्षित (UR) साठी 76.66, अनुसूचित जाती (SC) साठी 70.40, अनुसूचित जमाती (ST) साठी 65.96, इतर मागासवर्ग (OBC) साठी 73.62, आर्थिक दुर्बल घटक (EWS) साठी 73.43, माजी सैनिक (ESM) साठी 43.86 इतके गुण लागले आहेत. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी आपल्या संबंधित विभागीय RRB संकेतस्थळावर जाऊन निकालाची लिंक उघडावी. त्यानंतर PDF स्वरूपात उपलब्ध उमेदवारांची यादी ‘Ctrl+F’ च्या सहाय्याने पाहता येईल. तसेच, वैयक्तिक गुणपत्रक पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून लॉगिन करावे लागेल.
या भरतीमध्ये १,७३६ पदे चीफ कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर, ९९४ पदे स्टेशन मास्टर, ३,१४४ पदे गुड्स ट्रेन मॅनेजर, १,५०७ पदे ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि ७३२ पदे सीनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांसाठी राखीव आहेत.