आता प्रवास होणार अधिक सोपा! रेल्वेच्या सर्व सेवा एकच ठिकाणी मिळणार, लवकरच लाँच होणार हे ॲप
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB)ने काही महिन्यांपूर्वी एका भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. या भरतीच्या माध्यमातून टेक्निशियन पदाच्या रिक्त जागी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार होती. या भरतीसाठी अनेक उमेदवार इच्छुक होते. मोठ्या संख्येने उमेदवार या अर्जाच्या प्रक्रियेत सहभागी झाले होते. RRB च्या या भरतीच्या माध्यमातून टेक्निशियन विभागातील ९१४४ रिक्त भरले जाणार होते. परंतु, या रिक्त जागांमध्ये भर करण्यात आली होती. एक जाहिरात जाहीर करण्यात आली होती. यामध्ये जाहीर करण्यात आले होते कि RRB च्या या टेक्निशियन पदांच्या भरतीसाठी असलेल्या रिक्त जागांमध्ये वाढ करून त्या १४२९८ करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Samsung कडून विद्यार्थ्यांना फ्युचर टेक स्किलचे प्रशिक्षण ! देशभरातील 3500 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
२४ ऑक्टोबर २०२४ रोजी या भरती संदर्भांत आयोजित असलेल्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. १८ डिसेंबर २०२४ तारखेला या परीक्षेची सुरुवात करण्यात येणार आहे. २९ डिसेंबर २०२४ या तारखेपर्यंत या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रवेश पत्रही जाहीर करण्यात आले होते. महत्वाची बातमी अशी आहे कि RRB Technician Application Status आज जाहीर करण्यात आले आहे. प्रवेश पत्र ऑनलाईन जाहीर करण्यात आले आहे. प्रवेश पत्र उमेदवारांना rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डाउनलोड करता येणार होता.
९ मार्च २०२४ रोजी या भरती संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. ९ मार्च २०२४ ते ८ एप्रिल २०२४ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत उमेदवारांना देण्यात आली होती. जर केलेल्या अर्जात काही त्रुटी असतील तर त्या उमेदवारांना सुधारता येणार होत्या, ३ जून २०२४ ते ६ जून २०२४ या तारखेच्या दरम्यान उमेदवारांना सुधारणा करण्याची मुदत देण्यात आली होती. तसेच २२ ऑगस्ट २०२४ या तारखेला रिक्त जागांच्या पदांमध्ये वाढ करण्यात आली. यामुळे इच्छुक उमेदवारांना पुन्हा अर्ज करता यावे म्हणून अँप्लिकेशन विंडो खुली करण्यात आली होती. २ ऑक्टोबरपासून उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली होती. तर १६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. तसेच ऑक्टोबर २०२४ च्या १७ तारखेपासून २१ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना त्रुटी सुधारण्याची मुदत देण्यात आली होती.
हे देखील वाचा : Union Bank स्थानिक बॅंक अधिकारी भरती ; 13 नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख
Technician Grade-I च्या पदासाठी उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र करावे लागणार होते. मुळात किमान १८ वर्षे वय असलेले उमेदवार तर जास्तीत जास्त ३६ वर्षे आयु असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकत होते. B.Sc./ B.Tech/ Diploma in Physics/ Electronics/ Computer/ IT/ Instrumentation मध्ये शिक्षण घेतलेले उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार होते. तर Technician Grade-III च्या पदासाठी किमान १८ वर्षांपासून ते जातीत जास्त ३३ आयु वय निश्चित करण्यात आले होते. अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.