Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इयत्ता चौथी, सातवीच्या विद्यार्थ्यांची रविवारी होणार शिष्यवृत्ती परीक्षा! संभाजीनगर जिल्ह्यातून ५९ हजार ९३३ विद्यार्थ्यांची नोंद

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. जिल्ह्यातून एकूण ५९ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 25, 2026 | 08:41 PM
इयत्ता चौथी, सातवीच्या विद्यार्थ्यांची रविवारी होणार शिष्यवृत्ती परीक्षा! संभाजीनगर जिल्ह्यातून ५९ हजार ९३३ विद्यार्थ्यांची नोंद
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी, २६ एप्रिल रोजी जिल्हाभरात पार पडणार आहे. या परीक्षेसाठी यंदा एकूण ५९ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेबाबत उत्साहाचे वातावरण असून, केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

PM Internship Scheme: फायनल इयरसोबत इंटर्नशिपची मोठी संधी; दरमहा 9000 रुपये, नियमांमध्ये मोठे बदल

नोंदणीकृत विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता चौथीच्या ३३ हजार ७३० तर सातवीच्या २६ हजार २०३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात चौथीसाठी १८८ आणि सातवीसाठी १७० अशी एकूण ३५८ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले की, प्रत्येक केंद्रावर पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था तसेच सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत पहिला पेपर होईल, ज्यामध्ये भाषा आणि गणित या विषयांचा समावेश असेल. त्यानंतर दुपारी २ ते ३.३० या वेळेत दुसरा पेपर होणार असून, त्यामध्ये तृतीय भाषा (इंग्रजी) आणि बुद्धिमत्ता चाचणीचा समावेश आहे. दोन्ही पेपर प्रत्येकी ७५ गुणांचे असणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक क्षमतेची चाचणी घेतली जाणार आहे.

अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित तसेच स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमधील विद्यार्थी या परीक्षेस पात्र आहेत. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन देणे हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या परीक्षेला शैक्षणिक क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शासनाकडून आर्थिक प्रोत्साहनही दिले जाते. इयत्ता चौथीतील यशस्वी विद्यार्थ्यांना दरवर्षी ५ हजार रुपये, तर सातवीतील विद्यार्थ्यांना ७ हजार ५०० रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते. ही मदत सलग तीन वर्षे दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळून त्यांच्या प्रगतीस चालना मिळते.

परदेशी शिष्यवृत्तीत शाखानिहाय वाटपावर प्रश्नचिन्ह, अभियांत्रिकीला झुकते माप; इतर शाखेतील विद्यार्थ्यांची नाराजी

दरम्यान, शासनाने १७ ऑक्टोबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार या शिष्यवृत्ती परीक्षेच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेतली जाणारी ही परीक्षा आता चौथी व सातवीसाठी घेतली जात आहे. तसेच परीक्षा दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी उपलब्ध झाली आहे. या बदलामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: Scholarship examination for 4th and 7th grade students to be held on sunday in sambhajinagar district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: गॅस टंचाईवर सरकारचा तोडगा! १.४४ लाख लिटर रॉकेल मंजूर; आजपासून ग्रामीण भागात वितरण सुरू
1

Chhatrapati Sambhajinagar: गॅस टंचाईवर सरकारचा तोडगा! १.४४ लाख लिटर रॉकेल मंजूर; आजपासून ग्रामीण भागात वितरण सुरू

Chhatrapati Sambhajinagar: मनपाची प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; १० टन प्लास्टिक जप्त, ७५ हजारांचा दंड वसूल
2

Chhatrapati Sambhajinagar: मनपाची प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; १० टन प्लास्टिक जप्त, ७५ हजारांचा दंड वसूल

Chhatrapati Sambhajinagar: ‘स्मार्ट सिटी’ला अखेर गुंडाळले! अधिकारी-कर्मचारी संभ्रमात; आयुक्तांशी चर्चेनंतर पुढील दिशा स्पष्ट
3

Chhatrapati Sambhajinagar: ‘स्मार्ट सिटी’ला अखेर गुंडाळले! अधिकारी-कर्मचारी संभ्रमात; आयुक्तांशी चर्चेनंतर पुढील दिशा स्पष्ट

Chhatrapati Sambhajinagar: ‘भक्ती’ आहे पण ‘पाणी’ नाही! कडाक्याच्या उन्हात भाविकांची पाण्यासाठी वणवण; देवस्थान प्रशासन उदासी
4

Chhatrapati Sambhajinagar: ‘भक्ती’ आहे पण ‘पाणी’ नाही! कडाक्याच्या उन्हात भाविकांची पाण्यासाठी वणवण; देवस्थान प्रशासन उदासी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.