Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळा आपल्या दारी! मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण विभागाची विशेष मोहीम

शिक्षण विभागाने ‘शाळा आपल्या दारी’ मोहीम राबवत प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या उपक्रमातून शाळाबाह्य मुलांना प्रवेश देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पावले उचलली जात आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 27, 2026 | 06:15 PM
शाळा आपल्या दारी! मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण विभागाची विशेष मोहीम

शाळा आपल्या दारी! मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण विभागाची विशेष मोहीम

Follow Us
Follow Us:
  • आता जिल्हा परिषद शाळाही होणार ‘स्मार्ट’
  • गुढीपाडवा, पट वाढवा’ हे विशेष अभियान
  • मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण विभागाची विशेष मोहीम
नीता परब, मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी आणि या शाळांना सुवर्णदिवस मिळवून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्च ते जून २०२६ या कालावधीत व्यापक उपक्रम राबविले जाणार आहेत. खाजगी शाळांच्या स्पर्धेत सरकारी शाळांचा टक्का वाढवण्यासाठी ‘राज्य स्तर समितीने’ नुकताच आपला सविस्तर अहवाल सादर केला असून, त्यामध्ये नाविन्यपूर्ण उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

नाविन्यपूर्ण योजना काय आहेत?

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ हे विशेष अभियान राबवून गावपातळीवर प्रवेशाचा संकल्प केला जाणार आहे. या अभियानासाठी विशेष ‘गीत’ तयार करण्यात आले असून, त्याद्वारे जिल्हा परिषद शाळांमधील स्मार्ट टीव्ही, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके आणि पोषण आहार अशा सुविधांची माहिती घराघरात पोहोचवली जाणार आहे.

Career 2026 : लाखांत नाही तर आता करोडोंमध्ये कमवा! 10 वी-12 वी नंतर ‘हे’ 5 ऑफबीट कोर्सेस देतील छप्परफाड सॅलरी

केवळ जाहिरातबाजी न करता, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य स्वतः दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ‘शाळा आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पालकांशी संवाद साधणार आहेत. मुलांच्या प्रगतीत मातांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘माता-पालक मेळावे’ आयोजित केले जातील, ज्यात मुलांचा आहार, आरोग्य आणि अभ्यासाच्या सवयींवर चर्चा केली जाईल. पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे असलेला ओढा लक्षात घेऊन, शिक्षणमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येही ‘सेमी-इंग्रजी’ वर्ग सुरू करण्यावर विशेष भर दिला जात आहे. तसेच, शाळेच्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे यशोगान करणारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून शाळांची विश्वासार्हता वाढवली जाणार आहे.

मोहिमेचे वैशिष्ट्य

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्थानिक प्रशासनालाही जोडण्यात आले आहे. जे पालक आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत घेतील, त्यांना प्रोत्साहन म्हणून स्थानिक करात सवलत देण्यासारखे ‘करमाफी अभियान’ राबविण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना करण्यात आले आहे. याशिवाय, शिक्षणाची वारी, ग्रंथदिंडी आणि चावडी वाचन यांसारख्या उपक्रमांतून संपूर्ण गाव शैक्षणिकदृष्ट्या साक्षर करण्याचा मानस आहे.

प्रशासकीय स्तरावरील कामाचे स्वरूप

प्रशासकीय स्तरावरही या मोहिमेची अंमलबजावणी कडक केली जाणार आहे. जिल्ह्यातील शिक्षण विभागातील वर्ग १ ते ३ मधील अधिकारी प्रत्येक ‘केंद्र दत्तक’ घेतील आणि तेथील भौतिक सुविधा व गुणवत्तेवर वैयक्तिक लक्ष देतील. प्रत्येक बीट स्तरावर एक ‘आदर्श शाळा’ मॉडेल म्हणून विकसित केली जाणार आहे.

सेमी इंग्लिश आणि स्मार्ट क्लास उपक्रम राबविणार

राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि प्रगत शिक्षण मिळावे, हे आमचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या आपल्या जिल्हा परिषद शाळांना आधुनिक सुविधांनी सज्ज करण्यासाठी आम्ही ‘सेमी-इंग्रजी’ आणि ‘स्मार्ट क्लास’ सारखे बदल घडवून आणत आहोत. ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ या अभियानाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवून आपण मराठी शाळांचे वैभव पुन्हा प्राप्त करणार,पालक, शिक्षक आणि स्थानिक प्रतिनिधींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.

Swadhar Yojana 2026: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलनंतर ‘बी-स्टेटमेंट’ कार्यालयात जमा करा; स्वाधारचा निधी मार्गस्थ

Web Title: School at your doorstep education department special enrollment drive for children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Career News
  • education
  • School

संबंधित बातम्या

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..
1

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?
2

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल
3

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह
4

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.