क्रिकेटमधून निवृत्ती, पण कमाई सुरूच! MS Dhoni ला BCCI कडून किती मिळते पेन्शन?
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने दमदार सुरुवात केली. सलामीवीर निशन मदुष्काने ६६ धावांची वेगवान खेळी केली, तर रविंदू रसंथाने ७१ धावांची संयमी खेळी केली. कर्णधार सोनल दिनुशानेही मधल्या फळीत ५२ धावांचे मोलाचे योगदान दिले. भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, ज्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने ९० षटकांत आठ विकेट्स गमावून ३६३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.
भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही, सलामीवीर यशस्वी जैस्वाल खाते न पव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर केएल राहुलने डाव सावरला. मात्र. देवदत्त पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकावर येऊन तुफान फटकेबाजी केली. पडिक्कलने १८ चौकारांसह नाबाद १४२ धावा केल्या. त्याला अष्टपैलू रवींद्र जडेजाची साथ मिळाली, जडेजाने ६३ धावा केल्या. खालच्या फळीत, मानव सुथारच्या ४१ धावा आणि गुरनूर ब्रारच्या १८ चेंडूंतील ताबडतोब ३६ धावांच्या जोरावर भारताने ९० षटकांत ६ विकेट्स गमावून ३५७ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.
दुसऱ्या डावात श्रीलंका इलेव्हनसाठी निशान मदुशंकाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ७३ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या आणि तो दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. अंजला बंदाराने ३५ धावा, तर निपुण धनंजयाने ४६ धावा केल्या. भारताकडून गुरनूर ब्रार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले, तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. श्रीलंकेने ४५ षटकांत ६ विकेट्स गमावून २०० धावा केल्या आणि आपला दुसरा डाव घोषित केला. त्यांनी भारतासमोर विजयासाठी २०७ धावांचे लक्ष्य ठेवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर यशस्वी जैस्वालने ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अवघ्या ४६ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. दुखापतीतून परतलेल्या कर्णधार शुभमन गिलनेही ४४ धावांचे योगदान दिले. अखेरीस, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने फलंदाजीत शानदार कामगिरी करत अवघ्या १५ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने नाबाद ३२ धावा ठोकल्या आणि ४५ षटकांत ४ विकेट्स गमावून २१४ धावा केल्या. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला.






