फोटो सौजन्य- सोशल मीडिया
पुणे विद्यापीठ आविष्कार संशोदन समिती अध्यक्ष प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे आणि पुणे विद्यापीठ अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष संचालक प्रा. डॉ. विनायक जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. विद्यापीठाच्या पूर्वीच्या परिपत्रकानुसार मार्गदर्शन शिबिर, कार्यशाळा तसेच महाविद्यालय, संस्थास्तरीय व विभागस्तरीय संशोधन स्पर्धा आयोजित करून अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत १९ सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. आता मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेसाठी १९ सप्टेंबरपर्यंत, तर महाविद्यालय, संस्थास्तरीय व विभागस्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धा आयोजित करण्यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
स्पर्धेतून पुढील स्तरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची व प्रकल्पांची माहिती तसेच सविस्तर अहवाल जिओटॅग केलेली छायाचित्रे सहित पीडीएफ स्वरूपात २६ सप्टेंबरपर्यंत गुगल फॉर्म द्वारे सादर करणे बंधनकारक आहे.
SSC CGL Exam 2026 : एसएससी सीजीएल परीक्षेच्या तारखा जाहीर! ‘या’ नव्या पॅटर्ननुसार होणार परीक्षा
निवडलेल्या प्रकल्पांसाठी विषय/पोस्टर कोड,एक मीटर बाय एक मीटर पोस्टर, १०० शब्दांचा अमूर्त, जिओटॅग केलेले छायाचित्र आणि एक मिनिटाचा व्हिडिओ क्लिप तयार ठेवावा लागणार आहे. प्राचार्य, संचालक, विभागप्रमुख आणि संशोधन समन्वयकांनी सुधारित मुदतीनुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.






