फोटो सौजन्य - Social Media
स्टॅफ सिलेक्शन कमिशनने जनरल ड्युटी पदासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित केली होती. ४ फेब्रुवारी २०२५ ते २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी नियुक्त होण्यास परीक्षेला पात्र करावे लागणार आहे. मुळात, या तारखेदरम्यान कॉम्प्युटर बेस्ड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसंदर्भात संपूर्ण माहिती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांचे एप्लिकेशन स्टेटस SSC GD च्या ssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहता येणार आहे.
मुळात, या भरतीला ५ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आले होते. तसेच उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. उमेदवारांना त्यांचे ऍप्लिकेशन डेट पाहण्यासाठी २६ जानेवारी २०२५ पर्यंतची वेळ देण्यात आली होती. तसेच ४ फेब्रुवारीपासून CBT परीक्षेस सुरुवात केली जाणार आहे. या परीक्षेच्या ४ दिवसांआधी प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले होते. प्रवेश पत्र जाहीर झाल्याने उमेदवारांना ते पाहता तसेच डाउनलोड करता येणार आहे.
SSC GD भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करताना काही महत्त्वाच्या अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. या अटी व शर्ती शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेसंदर्भात निश्चित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयाची अट पाहता, किमान वयोमर्यादा १८ वर्षे असून जास्तीत जास्त २३ वर्षे वय असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. एकूण ३९,४८१ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती, ज्यामुळे देशभरातील लाखो उमेदवार या संधीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करीत आहेत.
भरती प्रक्रियेचा विचार करता, नियुक्तीसाठी चार टप्पे पार करणे आवश्यक आहे. प्रथम टप्प्यात लेखी परीक्षा होणार असून त्यात उमेदवारांनी चांगले गुण मिळवणे गरजेचे आहे. लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना पुढे शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल. या चाचणीत उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाईल ज्यामध्ये धावणे, उंची मापन आणि अन्य निकषांचा समावेश असेल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात दस्तऐवजांची तपासणी होईल, जिथे उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक आणि ओळखपत्राशी संबंधित कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. चौथा आणि अंतिम टप्पा वैद्यकीय चाचणीचा असेल, जिथे उमेदवारांच्या आरोग्याची सविस्तर तपासणी करण्यात येईल. या चारही टप्प्यांमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना शेवटी नियुक्ती देण्यात येईल.
या भरतीमुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPF) मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती होऊन देशाच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी नवे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.