Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक संपावर! ‘या’ तारखेपासून दिला आंदोलनाचा इशारा

राज्यातील सुमारे १७ लाख सरकारी कर्मचारी व शिक्षक २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत अकोल्यातून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 20, 2026 | 03:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Akola : राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत राज्यभरातील सुमारे १७ लाख कर्मचारी व शिक्षक २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अकोला येथून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत हा इशारा देण्यात आला आहे. कर्मचारी संघटनांच्या मते, गेल्या वर्षभरापासून विविध मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. नव्या युती सरकारकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकशाही मार्गाने अनेक आंदोलनात्मक कृती केल्या आहेत.

CET परीक्षेबाबत परीक्षा केंद्रांची माहिती जाहीर; अंतिम प्रवेशपत्रात ‘या’ माहितीला करण्यात आले प्रसिद्ध

६ मार्च रोजी राज्यभर धरणे सत्याग्रह करण्यात आला होता. त्यानंतर ५ डिसेंबर २०२५ रोजी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘शाळा बंद’ आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच १२ फेब्रुवारी रोजी शासनाच्या नकारात्मक भूमिकेचा निषेध करण्यासाठी पुन्हा एकदा धरणे आंदोलन करण्यात आले होते. याशिवाय, कर्मचारी संघटनांनी बेमुदत साखळी उपोषणाचाही मार्ग अवलंबला होता. त्या वेळी राज्याच्या मुख्य सचिवांनी १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवत ११ डिसेंबर रोजी उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही चर्चेसंदर्भात कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने कर्मचारी संघटनांमध्ये असंतोष वाढला आहे.

संघटनांच्या म्हणण्यानुसार, सरकार स्वतःला संवेदनशील म्हणत असले तरी प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या बेमुदत संपामुळे शासकीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आंदोलनाचा परिणाम शासकीय कार्यालये, शाळा आणि इतर सार्वजनिक सेवांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कर्मचारी संघटनांनी मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सोमवारपासून ‘वैद्यकीय’ परीक्षा! राज्यातून ४३,९२८ हजार विद्यार्थी; १७५ केंद्रांवर होणार पेपर

निवेदन देताना संघटनेचे राजेंद्र नेरकर, नीलेश दामोदर, गणेश जानोरकर, भुषण बोर्ड, संतोष इंगळे, चंद्रशेखर वासनिक, वर्षा भुजाडे, सुखदेव मनवर, नितीन राठोड, मिलिंद इंगळे, विवेक मानकीकर, वैशाली डोंगरे, प्रिती इंगळे, अनुजा आगळे, अमोल गवई, गजानन सोनोने, आदित्य नेमाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. एकूणच, सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: State government employees and teachers on strike in akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • buldhana news
  • Education Department
  • Washim news

संबंधित बातम्या

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट
1

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट

खडकपूर्णा प्रकल्पात ७ टक्केच जलसाठा; बुलढाणा जिल्ह्यात मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा साठा, पेयजल अन् सिंचनाची चिंता वाढली
2

खडकपूर्णा प्रकल्पात ७ टक्केच जलसाठा; बुलढाणा जिल्ह्यात मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा साठा, पेयजल अन् सिंचनाची चिंता वाढली

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
3

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
4

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.