फोटो सौजन्य - Social Media
कॉमर्सची लागली गोडी, हीच गुरुकिल्ली
व्यवसायाने सीए असलेल्या प्रमोद जोशी यांच्या शिकवणीला जाऊ लागली. तिथेच तिला कॉमर्सची गोडी लागली. जोशी यांनी तिच्या अभ्यासातील गुण ओळखून साक्षीला ‘तू सीए होऊ शकतेस’ असा सल्ला दिला. तोच तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. घरातील आर्थिक परिस्थिती कठीण होती. आई मनोधैर्य वाढवत होती, बाबा रिक्षा चालवत स्वप्नांना इंधन देत होते, असे सांगताना साक्षी भावनिक झाली. चार वर्षांची असताना साक्षीने ऐतिहासिक माहुली किल्ला सर केला होता. तेव्हाच तिच्यातील जिद्दीची झलक दिसली होती. आज तीच जिद्द तिला सीए बनवून गेली.
कठोर परिश्रमाला पर्याय नाही
कठोर परिश्रमाला कधीही पर्याय नसतो, १ असं सांगत साक्षीने सर्व मित्र, नातेवाईक आणि मार्गदर्शकांचे आभार मानले. साक्षीचे वडील सुरेंद्र खरे म्हणाले की, रआम्ही फक्त पाठिंबा दिला. बाकी तिच्या मेहनतीचे फळ आहे. तिचे ध्येय गाठलंय, आता पुढची वाट ती स्वतः घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहापूर शहरप्रमुख विजय देशमुख, माजी नगराध्यक्ष रजनी शिंदे यांनी साक्षीच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला तर माजी अनेक राजकीय पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी मोबाईल द्वारे तिचे अभिनंदन केले आहे.






