फोटो सौजन्य - Social Media
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून युक्रेन तसेच रशिया दरम्यान असलेले वातवरण अतिशय तापलेले आहे. तेथील स्थायिक रोज काही ना काही गोष्टींना बळी पडत आहेत. दररोज अनेक लोकं मृत्यमुखी जात आहेत. तेथील लोकांना अनेक गोष्टींची गैरसोय होत आहे. एक वेळ अशी आली होती कि तिथे मृत्यूने थैमान घातले होते. या मृत्यूच्या तांडवात अनेक जण बळी पडले होते. यामध्ये स्थानिक नागरिकांबरोबर इतर देशांतून आलेल्या नागरिकांनाही खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता. महत्वाचे म्हणजे रशिया, युक्रेनसारख्या देशांमध्ये अनके भारतीय शिक्षण तसेच कामानिमित्त जात असतात. अनेक भारतीय या युद्धादरम्यान रशिया युक्रेनमध्ये अडकून होते. भारत सरकार त्यांना मायदेशी पर्फत आणण्यासाठी प्रयत्न करत होते. यादरम्यान बिहार मधील एका भारतीय तरुणाने अशा युद्धाच्या परिस्थितीत मायदेशापासून लाखो किमी दूर असलेल्या युक्रेनमध्ये आपले MBBS चे शिक्षण पूर्ण केले आहे.
बिहार राज्यातील स्थायिक पंकज कुमार वैद्यकीय क्षेत्रातील एक विद्यार्थी आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या काळात पंकज शिक्षण अर्धवट सोडून भारतात आला होता. अनेक काळ भारतात काढल्यानंतर त्याला त्याचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करावे असे वाटले. त्यास्तही त्याने पुन्हा युक्रेनला जुन्याचे ठरवले. या युद्धाच्या काळात त्याने पुन्हा युक्रेनला जाऊन त्याचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान त्याला अनेक वाईट अनुभव आल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याने त्याच्या शिक्षकांने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आवर्जून सांगितले आहे.
एका मीडिया एजेन्सीसोबत बोलताना पंकज म्हणतो कि,” मी माझे युक्रेनमधील MBBS चे शिक्षण २०१८ साली सुरु केले होते. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात मी युक्रेनमध्ये होतो. यानंतर, लगेच मी भारताकडे रवाना झालो. यादरम्यान शिक्षण अर्धवट सोडून आल्याची खंत जाणवत असल्यामुळे मी युक्रेनला परतण्याचे ठरवले. नोव्हेंबर २०२२ ला मी युक्रेनला परतून माझ्या MBBS च्या शिक्षणात रुजू झालो.” यादरम्यान पंकजने त्याच्या अनुभवाविषयी सांगितले आहे.
त्याचे म्हणणे आहे कि त्याने जास्त वेळ रुग्णालयात शिक्षकांच्या मदतीस घालवले आहे. दिवसात ४ ते ६ सर्जरीमध्ये तो त्यांची मदत करायचा. रोज हल्ले व्हायचे, त्यात जेवणाची कमी असायची. सगळं काही विस्खलित होते. रात्री झोपतानाही त्रास व्हायचा कारण सतत युद्धाची भीती मनात असायची. इतकेच नाही, तर त्याने लाईव्ह युद्धही पाहिले असल्याचे त्याने सांगितले आहे. या परिस्थितीमध्ये पंकजने जिद्दीने MBBS पूर्ण केल्यामुळे सगळीकडे त्याचे कौतुक होत आहे.






