फोटो सौजन्य - Social Media
पाहता-पाहता २०२४ वर्षाचे उत्तररार्ध सुरु झाले आहे. या वर्षांमध्ये करिअर क्षेत्रात अनेक उत्क्रांती घडली आहे. जस जसा काळ बदलत जात आहे. तसतसे नवनवीन नोकऱ्यांच्या संध्या येत आहेत. तर काही जुन्या नोकऱ्याच नवीन नोकऱ्यांचे रूप धारण करत आहे. याला सर्वस्वी जबाबदार तंत्रज्ञान आहे. काळानुसार, तंत्रज्ञानामध्ये विकास होत आहे. हा घडता बदल, करिअर क्षेत्रासाठी फार महत्वाचा आहे. करिअर क्षेत्रामध्ये उत्क्रान्ति होत आहे. जर तुम्ही २०२५ मध्ये नोकरी करण्यासाठी तसेच स्वतःचे करिअर घडवण्यासाठी तयार आहात, तर अशा काही नोकर्या आहेत, ज्या नक्कीच पैशांचा वर्षाव करतील. AI मध्ये होणारी उत्क्रांती तसेच मशीनमध्ये वाढ अशामुळे नोकऱ्यांची विविध पदे निर्मितीस आली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, २०२५ मध्ये करण्यासाठी बेस्ट जॉब्स:
डेटा सायंटिस्ट
व्यवसाय क्षेत्रामध्ये व्यवसायासंबंधित असलेला डेटा अभ्यासून त्याच्या आधारे घेण्यात आलेले निर्णय व्यवसायासाठी फार महत्वपूर्ण ठरत आहे. व्यावसायिकांनी त्याची आवश्यकता जाणून घेतली आहे. त्यामुळे भविष्यात डेटा सायंटिस्टच्या पदासाठी उमेदवारांची मोठी मागणी असणार आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग इंजिनिअर
AI आणि मशीन लर्निंग हे विकसित तंत्रज्ञान आहे तसेच बऱ्याच क्षेत्राचे भविष्य आहे. करिअर क्षेत्रात या संबंधित अनेक नोकऱ्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. AI असो वा मशीन लर्निंग, यामध्ये तद्न्य उमेदवारांना भविष्यात चांगल्या संध्या पाहायला मिळतील.
सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट
सायबर गुन्हे फार वाढत आहेत. अशा मध्ये मोठा मोठ्या कंपनीला आपल्या खाजगी माहितीला सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सिक्योरिटी एक्सपर्टची गरज भासत आहे. २०२५ मध्ये करिअरची सुरुवात करू पाहणार्या उमेदवारांसाठी सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट हे पद उत्तम पर्याय आहे.
क्लाउड कॉम्प्युटिंग प्रोफेशनल
क्लाउड कॉम्प्युटिंग प्रोफेशनल पदासाठी उमेदवारांची मोठ्या संख्येने निवड करण्यात येईल. कंपनीचा डेटा आणि एप्लिकेशनला क्लाउडमध्ये ट्रान्स्फर करणे आणि सेव्ह करणे क्लाउड कॉम्प्युटिंग प्रोफेशनलचे काम असते.
डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट
डिजिटल मार्केटिंग एक्सपर्टच्या साहय्याने कंपनी आपल्या वस्तूंना डिजिटल माध्यमातून प्रमोट करते. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचते. त्यामुळे या पदासाठीही करिअर क्षेत्रात फार मोठी संधी आहे.
सोशल मीडिया मॅनेजर
सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांना आपल्या अकाउंट्स आणि कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी सोशल मीडिया मॅनेजरची गरज भासते. पुढील वर्षीही या क्षेत्रात नोकऱ्यांची मागणी कायम राहील. अनेक मीडिया कंपन्यांना यांची गरज भासते.