फोटो सौजन्य - Social Media
युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)ने सिविल सर्व्हिस एग्जाम (CSE ) चे आयोजन केले आहे. २२ जानेवारी, २०२५ रोजी ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ही अधिकृत जाहिरात https://upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना ११ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. महत्वाची माहिती अशी आहे कि या परीक्षेचे आयोजन २५ मे, २०२५ रोजी जाहीर करण्यात आले आहे. CSE परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या निकषांना पात्र करावे लागणार आहे? चला तर मग जाणून घेऊयात.
कोण कोण करू शकतो या परीक्षेसाठी अर्ज?
नागरी सेवा परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी, अर्जदाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी अंतिम वर्षाचे उमेदवारही अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा यासह परीक्षेशी संबंधित इतर अटी आणि शर्तींबद्दल माहिती मिळविण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या अधिसूचनेवरूनच तपशील मिळू शकतील. अधिसूचनेमध्ये या भरती संदर्भात काही महत्वाच्या अटी शर्ती नमूद आहेत. किमान २१ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त ३२ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.
या परीक्षेद्वारे, भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलिस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि भारतीय महसूल सेवा (IRS) आणि इतर सेवांमध्ये अधिकाऱ्यांची भरती केली जाते. या सेवांमध्ये रुजू होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत तीन टप्पे असतात. प्रथम पूर्व परीक्षा घेतली जाते. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसावे लागते. यानंतर, मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
गेल्या वर्षी कधी आयोजित करण्यात आली होती परीक्षा?
UPSC CSE परीक्षा २०२४ या संदर्भात अधिकृत अधिसूचना १४ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले होते. तसेच फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ५ मार्च, २०२४ निश्चित करण्यात आली होती. उमेदवारांना ६ मार्च, २०२४ पर्यंत अर्ज फॉर्ममधील चुकांना सुधारवण्यासाठी ही संधी देण्यात आली होती. तसेच २०२४ परीक्षेत १०५६ पदांसाठी नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.