वसई विरार शहर महापालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि आर्थिक व्यवहारांवर देखरेख करणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदी बहुजन विकास आघाडीचे प्रवीण शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुरानी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीदरम्यान निलेश चौधरी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने प्रवीण शेट्टी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. निवड जाहीर होताच हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.