फोटो सौजन्य - Social Media
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने युवकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी आणली आहे. IOCL मध्ये काम करू पाहणाऱ्या अनेक तरुणांना या संधीचे सोने करता येणार आहे. एकूण ४०० पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु केली गेली असून यात ट्रेड, टेक्निशियन तसेच ग्रॅज्युएट अप्रेन्टिसचा समावेश असणार आहे. सदर पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लगेच अर्ज करावे असे निर्देश IOCLने जारी केले आहेत. अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून ऑगस्टच्या १९ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. एकंदरीत, अर्ज करण्यासाठी उमेदवारांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या अधिकृत संकेतस्थळाला ( iocl.com ) भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावर रिक्रुटमेंटबद्दल विस्तारित माहिती मिळून जाईल.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी IOCL ने जारी केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. वयोमर्यादेत काही अटीशर्ती लागू आहेत कि अर्जकर्त्या उमेदवाराचे वय १८ वर्षे ते २४ वर्षे दरम्यान असावे. उमेदवाराचे आयटीआय, डिप्लोमा किंवा पदांच्या संबंधित असणारे शिक्षण झाले असावे, तरच उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा काही प्रमाणात शिथिल केले आहेत. जर उमेदवार एससी/ एसटी प्रवर्गातील सूट असेल तर त्यांना अधिक ५ वर्षापर्यंतची सूट आहे. तर ओबीसी परवर्गातील उमेदवारांना अधिक ३ वर्षांपर्यंतची सूट आहे. पीडब्ल्यूबीडी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना अधिक १० वर्षापर्यंतची सूट आहे. निवड प्रक्रियेत लिखित परीक्षा तसेच मुलखतीचा समावेश आहे.
अर्ज करण्यासाठी खालील टप्प्यांचे अनुसरण करा.