फोटो सौजन्य- iStock
तुम्ही जर नोकरी करत आहात आणि तुम्हाला MBA ( Master of Business Administration) करायचे असेल तर भारतामध्ये जागतिक क्रमवारीमध्ये उत्तम स्थान असणारा एमबीए अभ्यासक्रम करता येऊ शकतो. जागतिक स्तरावर विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करणाऱ्या Quacquarelli Symonds (QS) ने कार्यकारी व्यवस्थापन कार्यक्रम (MBA) ऑफर करणाऱ्या संस्थांची नवीन क्रमवारी जारी केली आहे. या क्रमवारीनुसार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) बंगलोर द्वारे चालवलेला एक्झिक्युटिव्ह एमबीए प्रोग्राम हा देशातील सर्वोत्तम MBA अभ्यासक्रमा आहे.
QS एक्सुक्युटीव्ह एमबीए रँकिंग 2024 मध्ये IIM बंगलोर जागतिक स्तरावर 41 व्या क्रमांकावर आहे. देशातील शैक्षणिक संस्थामधील हे सर्वात अव्वल रॅंकिंग आहे. IIM बंगलोरच्या एबीएला गेल्यावर्षी 43 वे स्थान देण्यात आले होते यावेळी 2 स्थानांनी सुधारणा झाली आहे. देशात दुसऱ्या क्रमांकावर इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या कार्यकारी एमबीएचे स्थान आहे. ज्याचे रॅंकिग 101-110 मध्ये आहे, गेल्यावर्षी या एबीएला 100 वे स्थान मिळाले होते.
QS एक्सुक्युटीव्ह एमबीए रँकिंगनुसार देशातील सर्वोत्तम मॅनेजमेंट संस्था
IIM बॅगलोर हे 41 व्या स्थानावर आहे. त्यानंतर इंडियन स्कूल ऑफ बिजनेस 101 ते 110 मध्ये स्थान आहे. IIM कोझिकोड,IMT गाजियाबाद या संस्था 171-180 क्रमांकामध्ये आहेत. त्यानंतर IIM इंदोर आणि वॉक्सेन स्कूल ऑफ बिजनेसचे स्थान आहे. या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा असते. ज्याचे वेळापत्रक संस्थाकडून जाहिर केले जाते.
QS एक्सुक्युटीव्ह एमबीए रँकिंगनुसार जगातील सर्वोत्तम मॅनेजमेंट संस्था
जगविख्यात ऑक्सफोर्ड विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे. IESE बिजनेस स्कूल स्पेनमधील संस्था दुसऱ्या स्थानी आहे.
HEC पेरिस या संस्थेला तिसरे स्थान दिले आहे. MIT, स्लोआन ही संस्था चौथ्या क्रमाकावर असून पाचव्या क्रमांकावर लंडन स्कूल ऑफ बिजनेस आहे. पहिल्या 5 मधील 4 संस्था युरोपातील असून MIT, स्लोआन संस्था अमेरिकेतील आहे. त्यामुळे सर्वोत्तम शैक्षणिक दर्जा अबाधित आहे हे सिद्ध होते. जगभरातून असंख्य विद्यार्थी या संस्थांमध्ये प्रवेशाकरिता प्रयत्न करतात.