फोटो सौजन्य - Social Media
ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग (GATE) परीक्षा एक ऑनलाईन परीक्षा आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. महत्वाचे म्हणजे IIT तसेच IISC मध्ये पदवीधर असलेल्या इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन केले जाते. GATE परीक्षा देशातील कठीण परीक्षांपैकी एक आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित आहात तर लक्षात असणे गरजेचे आहे कि परीक्षेच्या माध्यमातून अनेक करिअर विकल्प उपलब्ध होतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येत उमेदवार गेट परीक्षेची तयारी करत असतात. गेट परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने IIT किंवा IISC मधून पदवीधर असणे गरजेचे आहे.
असे अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांनी गेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. परंतु, गेट उत्तीर्ण झाल्यावर काय? असा प्रश्न मनात धरून आहेत. तर काही असेही विद्यार्थी आहेत, ज्यांना इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे. परंतु, गेट परीक्षेनंतर कोणती आणि कुठे पाऊले उचलावी? असे प्रश्न मनामध्ये आहेत. महत्वाची बाब म्हणजे गेट परीक्षा उत्तीर्ण केल्यावर विद्यार्थ्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध होतात. चला तर मग जाणून घेऊया अशा पर्यायांबद्दल जे गेट उत्तीर्ण केल्यावर उपलब्ध होतात.
GATE परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना देशातील टॉप IIT महाविद्यालयांतून M.Tech करण्याची संधी मिळते. इतकेच नव्हे तर उमेदवार कोणत्याही खाजगी विद्यापीठातून M.Tech चे शिक्षण घेऊ शकतो. गेट परीक्षेतील गुणांच्या आधारावर M.Tech मध्ये प्रवेश मिळतो. त्याचबरोबर उमेदवार PHD करू शकतो. बीटेक मध्ये पदवीधर असणारा उमेदवाराला जर PHd करण्याची इच्छा आहे तर गेट उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.
गेट मध्ये उत्तीर्ण उमेदवार संशोधनात देखील करिअर घडवू शकतात. BARC तसेच इसरोमध्ये संशोधक म्हणून कार्य करू शकतात. गेट परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार PG डिप्लोमाही करू शकतात. जर तुम्ही गेट उत्तीर्ण आहात आणि सरकारी क्षेत्रात नोकरीची संधी शोधात आहात तर बीएचईएल, आईओसीएल, ओएनजीसी, एनटीपीसीसारख्या कंपनीमध्ये पीएसयू पदी आपली भूमिका बजावू शकता. या क्षेत्रामध्ये कंपन्यांना मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांची गरज असते. असे अनेक पर्याय GATE उत्तीर्ण झाल्यावर उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या इच्छेअनुसार योग्य ते पर्याय निवडावे.