फोटो सौजन्य - नवराष्ट्र टीम
School Period Rules: सामान्यतः शाळांमध्ये तास (पीरियड) सुरू होताच मुलांच्या मनात पहिला प्रश्न हाच येतो की, हा तास कधी संपणार. कधी कधी ४५ मिनिटांचा हा वेळ डोळ्यांची पाती लवते ना लवते तोच निघून जातो, तर कधी कधी तो खूप मोठा वाटू लागतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, बहुतांश शाळांमध्ये एक तास ४० ते ४५ मिनिटांचाच का असतो? चला तर मग जाणून घेऊया यामागचे नेमके कारण.
१९ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत शाळांमध्ये एक तास सामान्यतः ६० मिनिटांचा असायचा. त्या काळात शिक्षण केवळ सकाळीच नाही, तर दुपारनंतरही चालत असे. मुलांना मधल्या वेळेत सुमारे तीन तासांची मोठा ब्रेक मिळायचा, ज्यामध्ये मुले घरी जाऊन जेवण करायची आणि पुन्हा शाळेत परतायची. तथापि, कालांतराने असे मानले जाऊ लागले की, जेवण केल्यानंतर मुलांची एकाग्रता कमी होते आणि उन्हाळ्यात अभ्यास करणेही कठीण होते. याच कारणामुळे शिक्षणतज्ज्ञांनी मुलांचा मानसिक थकवा आणि त्यांची शिकण्याची क्षमता यावर अभ्यास सुरू केला.
२० व्या शतकाच्या सुरुवातीला मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांनी अनेक प्रयोग केले. या संशोधनातून असे समोर आले की, सलग ६० मिनिटांपर्यंत अभ्यास करणे, मुलांसाठी थकवणारे ठरू शकते. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी असा सल्ला दिला की, लहान मुलांसाठी ३० मिनिटे आणि मोठ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ ते ५० मिनिटांचे वर्ग प्रभावी ठरतील. कमी वेळेच्या तासामध्ये मुले अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतात आणि त्याचा अभ्यासावर सकारात्मक परिणाम होतो, असे त्यांचे मत होते.
२२ ऑगस्ट १९११ रोजी तत्कालीन प्रुशियाचे सांस्कृतिक मंत्री ऑगस्ट वॉन ट्रॉट जू सोल्ज यांनी एक आदेश जारी केला, त्यानुसार उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये एका तासाचा कालावधी ४५ मिनिटे असेल असे ठरवण्यात आले. हा निर्णय त्या काळातील शिक्षणतज्ज्ञांच्या शिफारसींवर आधारित होता.
४५ मिनिटांचा तास लागू झाल्यानंतर,या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. अनेक शिक्षकांचे असे मत होते की, ४५ मिनिटांचा वेळ अभ्यासासाठी पुरेसा नाही. इतक्या कमी वेळेत एखादा विषय सविस्तरपणे समजावून सांगणे कठीण होईल आणि शिक्षण केवळ घाईघाईने अभ्यासक्रम संपवण्यापुरते मर्यादित राहील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
Rahul Gandhi Education: राहुल गांधी किती शिकलेत? जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर…
विरोधानंतरही ४५ मिनिटांचे हे मॉडेल यशस्वी ठरले आणि हळूहळू जर्मनीच्या इतर भागांतही लागू करण्यात आले. पुढे अनेक देशांनी ही व्यवस्था स्वीकारली. आजही जर्मनी, इंग्लंड, ब्रिटन आणि पोलंड यांसारख्या देशांमध्ये ४५ मिनिटांच्या आसपासचे तास असणे सामान्य आहे.






