Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Triple Murder Case: १६ वर्षांच्या मुलाने भाऊ, वहिणी आणि ३ वर्षांच्या भाच्याची केली निघृण हत्या, धक्कादायक कारण समोर…

Crime News : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये १६ वर्षीय मुलाने धक्कादायक कट रचत आपल्या कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 23, 2026 | 09:53 AM
नागपूर पुन्हा हादरले ! भांडेवाडीत गुंडाचा तर कामठीत महिलेचा खून; पोलिसांचा शोध सुरु

नागपूर पुन्हा हादरले ! भांडेवाडीत गुंडाचा तर कामठीत महिलेचा खून; पोलिसांचा शोध सुरु

Follow Us
Follow Us:
  • घरातील एका घटनेनंतर कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
  • मध्यरात्री घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरला आणि पोलिसांची धावपळ उडाली.
  • प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि मनातील नाराजी महत्त्वाची कडी ठरत असल्याचे संकेत मिळाले.
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. इथे किशोरवयीन भाऊच कुटुंबाच्या जीवावर उठला आणि एका क्षणातच त्याने हसत्या-खेळत्या घराची राखरांगोळी केली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी केवळ १६ वर्षांच्या मुलाने हातात धारदार शस्त्र घेत आपल्या घरातील तीन जणांचा खून केला. यात भाऊ, वहिनी आणि ३ वर्षांच्या भाच्याचा समावेश आहे. नववीत शिकणाऱ्या मुलाने तिहेरी हत्याकांडाचा रचलेला हा डाव पाहून आजूबाजूचे लोक घाबरले असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nagpur Crime: संतापजनक! मदरसा शिक्षकाकडून 10 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; आरोपी फरार

झोपेतच केला खून

ही घटना बांसगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून मृतांच्या राहत्या घरी झोपेतच त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे. दोन मजली घराच्या पहिल्या मजल्यावर अमित गुप्ता, त्यांची पत्नी रंजना, नऊ वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा राहत होता, तर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत धाकटा भाऊ राहत होता. रात्री अचानक ३ वाजताच्या सुमारात आरोपी अमित यांच्या खोलित घुसला आणि त्याने झोपेतच भाऊ, वहिणी आणि तीन वर्षांच्या भाच्याचा खून केला. नऊ वर्षांच्या भाचीने ही घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली ज्यानंतर ती आरडाओरड करत खोलीतून बाहेर पळाली. मुलीचा आरडाओरड ऐकत घरात असलेले आजी-आजोबा खोलीजवळ पोहोचले तर त्यांना खोलित रक्ताचा सडा पसरलेला दिसला. घटनेनंतर आरोपी शांतपणे आपल्या खोलित जाऊन बसल्याचे सांगण्यात येत आहे. वडिल हरिलाल गुप्ता यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आण त्यांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतले.

खुनाचे कारण काय?

या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. एकाच घरात राहणाऱ्या किशोरवयीन मुलाने आपल्याच कुटुंबियांना मारण्याचा निर्णय का घेतला याचा शोध पोलिसांनी सुरु केला. पोलिसांच्या शोधकार्यात समजले की, या हत्याकांडामागचे मूळ कारण हे काैंटुबिक कलह होता. आरोपी गुप्ता कुटुंबातील छोटेसे दुकान चालवत होता. काही महिन्यांपूर्वीच त्याचा मोठा भाऊ गावावरुन घरी परतला ज्यानंतर त्याला आपल्या हातातून दुकान जातंय की काय अशी भिती वाटू लागली. त्याचबरोबर भावाच्या येण्याने कुटुंबाचे आपल्यावरील प्रेम आणि महत्त्व कमी होईल अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली. याच कारणामुळे आणि मनातील मत्सरामुळे आरोपीने मोठा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलांना मारण्याचा कट रचला.

Solapur Crime News: शेतजमिनीच्या वादातून 55 वर्षीय शेतकऱ्याची तलवारीने हत्या; सख्ख्या भावानेच केला सपासप वार

वडिल रुग्णालयात दाखल

आरोपी मुलाचे वडिल हरीलाल गुप्ता हे हार्ट पेशंट असल्याने या घटनेनंतर त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. त्यांना जवळच्या रुग्णालायात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांआधीच वडिल आणि धाकट्या मुलामध्ये जोरदार वाद झाला होता ज्याला पोलिस ठाण्यात मिटवण्यात आले. हत्येनंतर आरोपी पळून गेला नाही तर तो आपल्या खोलित जाऊन बसला जिथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनेत मृत पावलेल्या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलिस घटनेचा सखोल तपास करत आहेत.

Web Title: 16 year old boy kills brother sister in law and nephew in gorakhpur triple murder case shocking reason revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.