Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: छ. संभाजीनगर हादरलं! पोलीस ठाण्याशेजारील मैदानावर १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; जुन्या वादातून रक्तरंजित थरार

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलीस ठाण्याशेजारील रामलीला मैदानावर १८ वर्षीय तरुण प्रवीण मांडोळे याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी प्रसंजीत हिवाळे आणि अरुण भूल यांना अटक केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 01, 2026 | 02:34 PM
छ. संभाजीनगर हादरलं! पोलीस ठाण्याशेजारील मैदानावर १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

छ. संभाजीनगर हादरलं! पोलीस ठाण्याशेजारील मैदानावर १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

Follow Us
Follow Us:

 

  • छ. संभाजीनगर हादरलं!
  • पोलीस ठाण्याशेजारील मैदानावर १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या
  • जुन्या वादातून रक्तरंजित थरार
छत्रपती संभाजीनगर: सिडको पोलिस ठाण्याच्या अगदी शेजारी असलेल्या रामलीला मैदान परिसरात रविवारी पहाटे १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान या रक्तरंजित घटनेत झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर खून होऊनही पोलिसांना त्याची माहिती सकाळपर्यंत मिळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रवीण सुरेश मांडोळे (१८, रा. संभाजी कॉलनी, एन-६) असे मृताचे नाव आहे. गुन्हे शाखा आणि सिडको पोलिसांच्या पथकाने मुख्य आरोपी प्रसंजीत हिवाळे आणि अरूण भूल या दोघांना नेवासा येथून अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो मित्र काळु उर्फ शुभम बिल्डा याच्याकडे गेला. यावेळी प्रसंजीत जुन्या वादावर तोडगा काढण्यासाठी बोलावत असल्याचे त्याने सांगितले. मित्रांनी जाण्यास विरोध केला; मात्र वाद कायमचा मिटविण्याच्या उद्देशाने प्रवीण भेटीसाठी गेला. त्यानंतर काही मित्रांसह ते रामलीला मैदान परिसरात गेले. वाद विकोपाला गेल्यानंतर प्रसंजीत व त्याच्या साथीदारांनी प्रवीणला पकडून त्याच्यावर चाकूने वार केले.

खबऱ्यांच्या मदतीने आरोपीचा काढला माग

घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिस व गुन्हे शाखेने तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींचा माग काढत त्यांना काही तासांतच नेवासा परिसरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. या प्रकरणात मुख्य आरोपींच्या साथीदारांचा शोध सुरु आहे. प्रकरणात मृत प्रविण मांडोळे यांच्या आई रेणुका मांडोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik: मध्यरात्री आलिशान गाड्यांतून आले अन् स्मशानभूमीत केली अघोरी विधी; अर्धनग्न मांत्रिक, अंडी, लिंबू,आणि…

उपचारदरम्यान मृत्यू

पाठीच्या खालच्या भागात गंभीर जखमा झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले. मित्रांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

उद्या कपडे घ्यायला जाऊ

तक्रारीत प्रविण मांडोळे याला बाजूला राहणाऱ्या काळू उर्फ शुभमच्या घरी दिलेला कुकर आणण्यासाठी सांगितले होते. प्रविणने कुकर आणला. यानंतर दहा वाजता प्रविण मांडोळे काहीही न सांगता निघून गेला. रात्री १०.३० वाजता रेणुका मांडोळे यांनी त्यांचा मुलगा प्रविण मांडोळे याला कॉल केला. पाहण्यांसाठी कपडे घ्यायला जायचे आहे असे सांगितले असता, प्रविण मांडोळे याने कपडे उद्या आणू असे सांगून फोन कट केला.

Gadchiroli Crime: Instagramवर जुळलं समलैंगिक प्रेम, लग्नाला नकार मिळताच मित्राचा गळा चिरून खून

Web Title: 18 year old youth stabbed to death on ground next to police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Murder News

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
1

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
2

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
3

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
4

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.