काय नेमकं प्रकरण?
महाराष्ट्र हा पुरोगामी समजला जातो. राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा आहे. मात्र तरीही अंधश्रद्धा कमी होण्याचं नाव घेत नाही. आता नाशिक जिल्ह्यातील सटाण्यामध्ये स्मशानभूमीत अघोरी पुजा करण्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काही संशयित व्यक्ती आलिशान वाहनांमधून जुन्या अमरधाम परिसरात दाखल झाले होते. त्यामुळे सुरूवातीला त्यांच्यावर कोणाचा संशय आला नाही. त्यांच्या सोबत भगवे वस्त्र धारण केलेला अर्धनग्न मांत्रिकही असल्याचे सांगितले जात आहे.
Gadchiroli Crime: Instagramवर जुळलं समलैंगिक प्रेम, लग्नाला नकार मिळताच मित्राचा गळा चिरून खून
या व्यक्तींने स्मशानभूमीतील चितास्थळाजवळ जाऊन अघोरी पूजा सुरू केली. या पूजेसाठी अंडी, लिंबू, उडीद, कवड्या, फुले, कापूर, नारळ तसेच इतर तांत्रिक साहित्याचा वापर करण्यात आल्याचे घटनास्थळी आढळून आले. पूजा संपल्यानंतर हे साहित्य तेथेच टाकून देण्यात आले. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू सोबत नेण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अमरधाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घ्यावा, तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिच्यासाठी घर सोडलं, तिनेच प्रियकराला संपवलं; लिव्ह-इन रिलेशनशिपचा थरारक अंत! नाशिक येथील घटना
नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय प्रेयसीने आपल्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराची हत्या केल्याची समोर आली आहे. या घटनेने नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना ही नाशिकच्या पेट्रोल परिसरात घडली.
या प्रकरणातील आरोपीचे नाव सोनाली राजेंद्र गायकवाड (32 वर्ष) असे आहे. तर हत्या झालेल्या तरुणाचे नाव पंढरीनाथ दांडगे (26 वर्ष) असे आहे. सोनाली ही विवाहित होती. या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सोनाली सोबतचे संबंध अमोलच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. याला त्याच्या घरच्यांचा कडाडून विरोध होता. त्यामुळे अमोल ने आपले घर सोडले. तो सोनाली सोबत साळवे चाळ नवनाथ नगर इथे लिव्ह इन मध्ये राहत होता. त्याचवेळी सोनाली हिला अमोल शेठ दुसऱ्या एका बाईसोबत संबंध असल्याचे समजले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि तिने अमोलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
Jalna Accident: झाडावर आदळली कार, क्षणात पेटली आग; चालकाला बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही
Ans: नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील जुन्या अमरधाम स्मशानभूमीत ही घटना घडली.
Ans: संपूर्ण प्रकार स्मशानभूमीतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनास्थळी पूजेसाठी वापरलेले साहित्यही आढळले.
Ans: संशयितांचा शोध घेऊन जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.






