
अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख चढता
२०२५ च्या १ जानेवारी ते ३ डिसेंबर या कालावधीत अमरावती पोलिस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ३७ राखुनांच्या घाटना चंडल्या आहेत. २०२४ च्या तुलनेत वाक्यों खुनांच्या संख्येत वाढ झाली आहे. या कालावधीत विविध गुन्ह्यांप्रकरणी ३२२० आरोपींना अटक करण्यात आली आहे. वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खुनाचा अपवाद वगळता उर्वरित ३६ खुनांच्या गुन्ह्यांतील आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, चलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिराळा येथील खुनाचे गूढ अद्याप उकललेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस सातत्याने करीत आहेत. गुन्हेगारीच्या आकडेवारीनुसार, खून व खुनाचा प्रयान या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असली तरी दरोड्याच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते. २०२४ मध्ये १४ दरोड्यांची नोंद होती, तर २०२५ मध्ये ही संख्या पटून ९ वा आली आहे. खुनाच्या प्रयत्नांच्या गुन्ह्यांतही किंचित वाह नोंदविण्यात आली आहे. २०२४ मध्ये ५२, तर २०२५ मध्ये ५३ गुन्हे दाखल झाले आहेत.
इतर गुन्ह्यांकडे पाहता, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी, बलात्कार, अपहरण तसेच अपघातांच्या घटनांमध्ये काही प्रमाणात घट-चाच दिसून येते. वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, अंमली पदार्थाचे व्यसन आणि वैयक्तिक वाद ही हत्या व हल्ल्यांची प्रमुख कारणे असल्याचे पोलिस सूत्रांचे मत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील संवेदनशील भागांत पाळत वाढविणात आली असून सीसीटीव्ही कॅमेरे, विशेष पथके आणि गस्तीद्वारे गुन्हेगारांवर करडी नजर ठेवली जात आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली.
दरोडे व घरफोडी घटल्या दरोड्याच्या गुन्ह्यांत मात्र दिलासादायक चित्र दिसते. २०२४ मध्ये १४, तर २०२५ मध्ये ९ दरोडे नोंदवले गेले, घरफोडी (२६७ वरून २४२), वहन चोरों (३९३ वरून ३४४) आणि साधी चोरी (३८१ वरून ३०६) या गुन्ह्यांतही घट झाली आहे. पोलिस गस्त, सीसीटीकी कैमेरे आणि विशेष पथकांच्या कार्यवाहीचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.
महिलांवरील गुन्हे व अपहरण अजूनही चिंताजनक बलात्काराच्या घटनांमध्ये घट होऊनही २०२५ मध्ये ४३ गुन्हे दाखल झाले, तर २०२४ मध्ये ही संख्या ५१ होती. अपहरणाच्या गुन्हांत १४८ वरून ११३ इतकी घट झाली असली, तरी ही संख्या अद्यापही चिंताजनक आहे.
खुनाच्या प्रधानाचे गुन्हेही चिंतेचा विषय ठरत आहेत. २०२४ मध्ये ५२, तर २०२५ माये ५३ गुन्हे दाखाल झाले. ही वाद संराहीने किरकोळ वाटली तरी हिंसक कद, वैयक्तिक शकुन आणि अंमली पदार्थया संवनापूर उद्भवणारे सार्थ पादत असल्याचे संबंत यातून मिळतात.
१ जानेवारी ते ३ डिसेंबर कालावधीत अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या हदीत ३७ खुनांच्या घटना घडल्या. २०२४ मध्ये ही संख्या ३२ होती. माणजेच एका वर्षात खुनांच्या घटनांमध्ये स्पष्ट वाढ झाली आहे. विशेष माणजे वलगाय पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिराळा येथील एक खून वगळता उर्वरित ३६ प्रकरणांत आरोपी अटक करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, एका प्रकरणाचे गूढ अद्याप न उकलणे ही तपास यंत्रणेसमोरील गंभीर कसोटी मानली जाते.
एकूण गुन्द्रद्यांची संख्या २०२४ मधील २५५५ वरून २०२५ मध्ये २३३१ इतकी कमी झाली आहे. मात्र, या घटेमागे दिलासा घेण्याऐवजी गंभीर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप अधिक धोकादायक ठरत असल्याचे विश्लेषण सांगते. मालमत्तेशी संबंधित मुनी कमी होत असताना, बेट जीवितहानी व हिंसाचाराशी संबंधित गुन्हें चाढणे ही गंभीर सामाजिक चेतावणी मानली जात आहे.